Iran US Israel War – होर्मुझजवळ महायुद्ध पेटलं; ‘एफ-15’नंतर इराणने अमेरिकेचे ‘ए-10 थंडरबोल्ट’ लढाऊ विमान पाडले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण, अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध आता धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिका इराणवर दबाव वाढवत आहे. शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला होता. अमेरिकेच्या या धमक्यांना इराण धमाक्यांनी उत्तर देत असून आखातातील अमेरिकन तळ आणि इस्रायलच्या प्रमुख शहरांवर तुफान हल्ले चढवत आहे. अशातच इराणने एकाच दिवशी अमेरिकेची दोन लढाऊ विमानं पाडली आहेत, त्यामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

शुक्रवारी इराणने अमेरिकन वायुसेनेचे ‘ए-10 थंडरबोल्ट’ हे लढाऊ विमान होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पाडले आहे. विशेष म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये इराणने अमेरिकेचे दुसरे लढाऊ विमान पाडले आहे. याआधी इराणने ‘एफ-15 ई स्ट्राईक ईगल’ हे शक्तीशाली विमान पाडले होते. त्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ ‘ए-10 थंडरबोल्ट’ लढाऊ विमानाला लक्ष्य केले. ‘न्यूयॉर्क टाइम्स’नेही या वृत्तास दुजोरा दिला असून ‘ए-10 थंडरबोल्ट’ विमानाचा पायलट सुरक्षित असून त्याला वाचवण्यात यश आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘इस्रायलच्या वेळा‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

Comments are closed.