तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने

Crime news छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्या: छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जबाजारीपणातून एका 26 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदेश दिनकर गवळी असे मृत तरुणाचे नाव असून, तो टँकर;e व्यवसाय करत होता. दीड वर्षांपूर्वी कर्जावर घेतलेला त्याचा ट्रक (Truck) चोरीला गेला होता. मात्र, ट्रक अद्याप सापडला नसतानाही कर्जाचे हप्ते सुरूच राहिल्याने तो आर्थिक तणावात होता. या नैराश्यातून संदेशने आत्महत्येचा (Suicide news) टोकाचा निर्णय घेतला. कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले असताना त्याने विषारी औषध प्राशन केले. प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी संदेशने एक सुसाइड नोट लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. संदेशने आपल्या सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी माझा ट्रक चोरणाऱ्या माणसाला मदत केली, असे संदेशने शेवटच्या चिठ्ठीत म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होणार का, याबाबत शंका उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे पोलीस प्रशासन काही विशेष पावले उचलणार का, हे बघावे लागेल. (Maharashtra Crime news)

Chhatrapati Sambhajinagar news: संदेश गवळीने सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहलं?

मी संदेश दिनकर गवळी आज दिनांक 2.4.2026 रोजी माझी जीवनयात्रा समाप्त करत आहे. त्यासाठी चिकलठाणा पोलीस प्रशासन जबाबदार आहे. ज्याने माझा ट्रक चोरला त्याच्याकडून लाच घेऊन पोलिसांनी त्याला साथ दिली. माझ्या मृत्यूसाठी इतर कोणी जबाबदार नसून सामान्य लोकांच्या सेवेसाठी नेमलेले पोलीस अधिकारी जबाबदार आहेत. माझा एमएच 46 पी 2797 हा ट्रक 6 ऑक्टोबर 2024 रोजी चोरीला गेला होता. या ट्रकवर कोटक बँकेचे लोन असून इन्शुरन्स नसल्याने ते पैसे मला भरावे लागत आहेत. या अपयशाचा शिक्का माझ्या माथी बसल्यामुळे मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. माझ्या मृत्यूसाठी इतर कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये, कोणालाही त्रास देऊ नये. माझ्या शेवटच्या क्षणी लागणाऱ्या खर्चासाठी माफी असावी. माझ्या आईची काळजी घ्यावी. माझे कोटक बँकेचे गाडीसोबत आलेला इन्शुरन्स आहे, त्याची मदत घ्यावी. तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर.

आणखी वाचा

शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना

आणखी वाचा

Comments are closed.