18 टक्के परताव्याचे आमिष दाखवत 131 कोटींची फसवणूक
गुंतवणूक केल्यास त्यावर 18 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत एका कुटुंबाची 131 कोटी 41 लाख 56 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लो. टि. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. प्रचंड मोठी आर्थिक फसवणूक असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
मे. ट्रिय्मफ रियल्टीचे मालक राजीव शाह, ट्रिय्मफ वेन्चर्सचे भागीदार अनंतराय शाह, राजीव शाह, कुमार शाह अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांनी कट रचून घाटकोपर पूर्वेकडे राहणारे जवाहरलाल शाह व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर 18 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. असे करत आरोपींनी त्यांना रोखीने व धनादेशाद्वारे तब्बल 64 कोटी 70 लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. शिवाय वर्ष 2016 ते मार्च 2018 या कालावधीमध्ये परताव्याची रक्कम देऊन आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. मात्र त्यानंतर परताव्याची रक्कम न देता जवाहरलाल शाह व त्यांच्या कुटुंबीयांनी गुंतवलेली रक्कम व त्यावरील परतावा अशी 131 कोटी 41 लाख 56 हजार रुपयांची फसवणूक केली. जवाहरलाल शाह यांच्या तक्रारीवरून लो. टि. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.