Crime news – नांदेडमध्ये गँगवारचा थरार; तिघांची निर्घृण हत्या; ई-स्क्वेअर आणि सरकारी रुग्णालयात रक्तरंजित राडा
नांदेड शहरात गँगवारने पुन्हा एकदा डोके वर काढले असून शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. शहरातील ई-स्क्वेअर परिसरात एकाची धारधार शस्त्राने वार करून, तर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोघांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नांदेडच्या कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील कॅनाल रोडवर असलेल्या ई-स्क्वेअर परिसरात सय्यद आवेज, सय्यद खलील आणि घनश्याम रेड्डी, मोहमद अरबाज आणि इतर अज्ञात हल्लेखोरांनी अरिजितसिंग चव्हाणवर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार केल्याने अरिजितसिंग गजानन चव्हाण (वय – 25) जागीच मरण पावला. हल्ल्यात जखमी सय्यद आवेज सय्यद खलील आणि आणखी एका युवकाला पोलिसांनी सरकारी रुग्णालयात नेले. त्यानंतर अरिजितसिंगचा भाऊ चाकू घेऊन दवाखान्यात गेला आणि जखमी असलेल्या सय्यद आवेज सय्यद खलील (वय -27) वर आणि मोहंमद अरबाज मोहंमद फारुख (वय – 23) वर दवाखान्यातील अपघात विभागाजवळ चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ते दोघारी जागीच गतप्राण झाले.
Comments are closed.