अमेरिकेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली
अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या हिंदुस्थानी तरुणांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. विदेश राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली. फेब्रुवारी 2026 पर्यंत अमेरिकेत 3.5 लाखांहून अधिक हिंदुस्थानी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 6.9 टक्के कमी आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये हा आकडा 3 लाख 78 हजार 787 होता. तो आता कमी होऊन 3 लाख 52 हजार 644 वर आला आहे. व्हिसा स्क्रीनिंग आणि कडक तपासणीमुळे ही घसरण झाल्याचे दिसत आहे.
Comments are closed.