Negative Thoughts : डोक्यात सतत निगेटिव्ह विचार? फॉलो करा हे नियम
बिझी लाईफस्टाईल आणि स्ट्रेसमुळे अनेकांच मेंटल हेल्थ बिघडत आहे. कामाचे प्रेशर, डिप्रेशन यासारख्या गोष्टीतून अनेकजण जात आहे. या सर्व गोष्टींमुळे डोक्यात सतत निगेटिव्ह विचारांचा गोंधळ सुरू होतो. स्वत:बद्ल एकही चांगली गोष्टी मनात येत नाही. कोणतीही गोष्ट करण्याआधी सतत नकारात्मक विचार डोक्यात येतात. प्रत्येक गोष्ट फक्त निगेटिव्ह नजरेने पाहिली जाते. याचा आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीतून तुम्हीही जात असाल तर आज आम्ही तुम्हाला आपल्यातील नकारात्मकता सो़ून सकारात्मक वाटचाल कशी करायची हे सांगणार आहोत.
- डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येत असतील तर काही वेळासाठी डोळे मिटून समस्यांशिवाय आयुष्य कसं असेल याची कल्पना करावी. यामुळे मन हलकं होतं.
- सकारात्मक राहण्यासाठी मेडिटेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. मेडिटेशन केल्याने एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढल्याने व्यक्ती सकारात्मक गोष्टींचा अधिक विचार करते.
- नकारात्मक बोलण्याऱ्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. तसेच 8 तासांची झोप नक्की घ्यावी.
- तणावापासून दूर राहण्यासाठी सकाळी लवकर उठावे.
हेही वाचा – Dating App: डेटिंग ऍप वापरणाऱ्या महिलांच्या संख्येत का होतेय वाढ?
- मित्र-मैत्रिणींसह परिवारासोबत विविध गोष्टींवर बोलावे.एकटे राहू नये.
- निगेटिव्ह विचारांना थारा न देण्यासाठी स्वत:ला कामात व्यस्त ठेवावे.
- स्वयंपाक, गाणे किंवा डान्स, पेटिंग अशा आवडणाऱ्या गोष्टी कराव्यात.
- मनातील सर्व वाईट विचार कागदावर उतरवा. यामुळे विचारांची तीव्रता कमी होते आणि स्पष्टता येते.
- मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जास्तीत जास्त वेळ कुटूंबासोबत घालवावा. मनात काही असेल तर त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने बोलावे.
- एखाद्या गोष्टीची चिंता करत बसण्यापेक्षा, त्यातून बाहेर पडण्याच्या शक्यतांकडे लक्ष क्रेंदित करावे. तुमचं एक सकारात्मक पाऊल तुम्हाला यातून नक्कीच बाहेर काढू शकेल.
हेही वाचा –
Comments are closed.