नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! मध्यरात्री तिघांचा बळी; भावाचा बदला घेण्यासाठी रुग्णालयातच हल्ला, हा
नांदेड: नांदेडमध्ये काल (शुक्रवारी, ता 3 एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास तीन जणांची हत्या (Nanded Crime news) झाल्याची थरारक घटना घडली आहे. नांदेडमधील डी मार्ट परिसरामध्ये असलेल्या ई-स्क्वेअरच्या बाजूलाच ही घटना घडलेली आहे. अर्जितसिंघ चव्हाण याचा या घटनेत जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या टोळीतील दोघांचा रूग्णालयात मृत्यू झाला आहे, ई-स्क्वेअरच्या बाजूला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जुन्या वादाच्या (Nanded Crime news) कारणातून काही गुन्हेगारांमध्ये तलवार आणि खंजीराने मारहाण झाली, या घटनेत सय्यद आवेज, सय्यद खलील आणि घनश्याम रेड्डी, मोहमद अरबाज आणि इतर अज्ञात हल्लेखोरांनी (Nanded Crime news) अर्जितसिंघ चव्हाणवर हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी वार केल्याने अर्जितसिंघ चव्हाण (वय 25) याचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या टोळीतील आवेज आणि अरबाज या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अर्जितसिंघ चव्हाणचा भाऊ चाकू घेऊन दवाखान्यात गेला आणि जखमी असलेल्या आवेजवरती दवाखान्यातच चाकूने हल्ला केला. या घटनेनं नांदेड शहरात गॅंगवाॅर पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे.(Nanded Crime news)
Nanded Crime news: नांदेडमधील गँगवॉरचा थरारक घटनाक्रम समोर
– मध्यरात्री रात्री दीड ते दोन वाजता अनिल पंजाबी-साईलाला यांच्या गँगने अर्जितसिंघ चव्हाण गँगवर हल्ला केला.
– अर्जितसिंघ चव्हाण गँग (तिघेजण) धुरंधर फिल्म बघून येत होती, त्यावेळी अनिल पंजाबी-साईलाला यांच्या गँगने हल्ला केला.
– नांदेडमधील डी मार्ट परिसरामध्ये असलेल्या ई-स्क्वेअरजवळ अनिल पंजाबी-साईलाला गँगमधील अरबाजचा तर दुसऱ्या गँगमधील अर्जितसिंघ चव्हाणचा मृत्यू झाला.
– अरबाज आणि आवेश घटनास्शळी गंभीर जखमी झाले होते. त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
– नंतर सिव्हील हॉस्पिटलमधून त्याला विष्णूपुरी रुग्णालयात पाठवण्यात आलं.
– विष्णुपुरी रुग्णालयात अर्जितसिंघ चव्हाणचा मृतदेह ऑलरेडी आणलेला होता, त्या मृतदेहाजवळ त्याचा भाऊ आणि वडील होता.
– अर्जितसिंघ चव्हाणच्या भावाने रुग्णालयातच गंभीर जखमी असलेल्या आवेशवर हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला.
– अनिल पंजाबी जेलमध्ये आहे, साईलाला दीड महिन्यापूर्वी जेलमधून बाहेर आला.
– अर्जितसिंघ चव्हाणवर ९ गुन्हे दाखल आहेत.
– दोन्ही टोळीतील सदस्यांवरती आधी गंभीर स्वरूपाची कारवाई झालेली आहे.
Nanded Crime news: पोलिसांनी या घटनेबाबत कोय म्हटलंय?
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास दोन टोळ्यांच्यामध्ये ही घटना घडली आहे, ही घटना ई-स्क्वेअर परिसरात घडली. त्या ठिकाणी दोन्ही टोळीमधील तिघे जण गंभीर जखमी झाले होते. दोन्ही टोळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे. या एका टोळीतील अनिल पंजाबी हा सध्या जेलमध्ये आहे. यामधील साहिल देखील दोन महिन्यापूर्वी जेलमधून बाहेर आला होता. त्यांच्या टोळीवरती आधी देखील कारवाई झालेली आहे, त्या टोळीतील काहींवर आधीही कडक कारवाई झालेली आहे, तर दुसरीकडे अर्जितसिंघ चव्हाण याच्यावर देखील नऊ गुन्हे दाखल होते, त्यांच्यासोबत आणखी एक आरोपी होता ज्याला आम्ही ताब्यात घेतले आहे, जो जखमी आहे, त्याच्यावर देखील 2025 मध्ये कारवाई झाली होती, एकंदरीत दोन्ही डोळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे, पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाई देखील त्यांच्यावर केलेली होती, यांच्यावरती हद्दपार सारखी कारवाई देखील झालेली आहे. या दोन्ही टोळ्यांच्या वादामध्ये एका टोळीतील अरबाज आणि आवेज या दोघांचाही मृत्यू झालेला आहे तर दुसरी बाजू म्हणजे अर्जितसिंघ चव्हाणचा देखील मृत्यू झालेला आहे, या टोळीच्या घटनेत एकंदरीत तीन जणांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.(Nanded Crime news)
यामधील दोघेजण घटनास्थळी गंभीर जखमी झालेले होते, आवेज देखील गंभीर जखमी होता, त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्याला विष्णुपुरी येथे रेफर करण्यात आले, तिथे तो खूप गंभीर स्वरूपाचा जखमी अवस्थेत गेला होता, तिथे आधीच अर्जितसिंघ चव्हाणचे भाऊ आणि वडील गेलेले होते, अर्जितसिंघ चव्हाणचा मृतदेह तिथे होता, त्याच ठिकाणी आवेज वर तिथे वार झाला, तो आधी ही गंभीर जखमी होता, शेवटी त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला, यामध्ये दोन एफआयआर झाले आहेत, ते दोन्ही क्रॉस आहेत, भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्येच दोन क्रॉस एफआयआर दाखल होतील. एक आहे ती अर्जितसिंघ चव्हाणच्या फॅमिलीची आणि दुसरी आवेज किंवा अरबाज या दोघांपैकी एकाची एफआयआर घेऊन मर्डरचे गुन्हे दाखल करणार आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Nanded Crime news: चित्रपट पाहून तो बाहेर पडला.
या वादामध्ये पहिल्यांदा मृत्यमुखी पडलेला अर्जितसिंघ चव्हाण हा बुलेट गाडीवर आला होता, त्याच्यासोबत आणखी दोन जण होते. तो धुरंधर सिनेमा बघून बाहेर आला होता, याच दरम्यान ही वादाची घटना घडली आहे, 4 आरोपी ताब्यात आहेत, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.