CSK ला हरवूनही पंजाबच्या वाघांना मिळालं नाही सुख; श्रेयस अय्यरसह सर्व खेळाडूंना भोगावे लागले भय

CSK vs PBKS IPL 2026 श्रेयस अय्यरला शिक्षा : आयपीएल (IPL 2026) मधील सातव्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेट्सनी शानदार विजय मिळवला. मात्र या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाकडून पुन्हा एकदा ‘स्लो ओव्हर रेट’ची चूक घडल्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरसह प्लेइंग इलेव्हनमधील सर्व खेळाडूंवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

आयपीएलने जारी केलेल्या निवेदनानुसार, चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात पंजाब किंग्सने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत हा या हंगामातील त्यांचा दुसरा गुन्हा ठरला. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यर याच्यावर 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच प्लेइंग 11 मधील इतर सर्व खेळाडूंना (इम्पॅक्ट प्लेयरसह) 6 लाख रुपये किंवा त्यांच्या सामन्याच्या फीपैकी 25 टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल ती दंड म्हणून भरावी लागणार आहे.

कर्णधारावर बंदीचा नियम बदलला

याआधी असा नियम होता की एका हंगामात तीन वेळा स्लो ओव्हर रेटची चूक झाल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली जात होती. मात्र आता हा नियम बदलण्यात आला असून, कर्णधारावर बंदी घालण्याऐवजी मैदानावर काही निर्बंध लादले जातील. त्यामुळे श्रेयस अय्यरसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

सामन्यात काय घडलं? (CSK vs PBKS IPL 2026)

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करत 209 धावांचा भक्कम डोंगर उभारला. आयुष म्हात्रेने 73 धावांची शानदार खेळी केली, तर शिवम दुबेने 45 धावा केल्या. प्रत्युत्तर पंजाब किंग्सकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर प्रभसिमरन सिंगने 43 धावांचे योगदान दिले. मात्र सामन्याचा खरा हिरो ठरला प्रियांश आर्य. त्याने अवघ्या 11 चेंडूंमध्ये 39 धावांची तुफानी खेळी करत संघाला विजयी सुरुवात करून दिली. या दमदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

हे ही वाचा –

IPL 2026 लाइव्ह अपडेट : आज दुहेरी धमाका! दुपारी डीसी विरुद्ध एमआय, तर संध्याकाळी जीटी विरुद्ध आरआर सामना

आणखी वाचा

Comments are closed.