धुरंधर 2 चित्रपट पाहून ई-स्क्वेअरमधून बाहेर आला अन्…; नांदेडच्या तिहेरी हत्याकांडाचा स्टार्ट
नांदेड: नांदेड शहरात गँगवॉरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक (Nanded Crime News) घटना समोर आली असून, या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून शहरातील ई-स्क्वेअर परिसरात आणि त्यानंतर थेट शासकीय रुग्णालयात रक्ताचा (Nanded Crime News) खेळ खेळला गेला. या हिंसक घटनेची सुरुवात शहरातील कॅनाल रोडवर असलेल्या ई-स्क्वेअर परिसरात झाली. येथे काही अज्ञात हल्लेखोरांनी पूर्ववैमनस्यातून अर्जितसिंघ गजानन चव्हाण याच्यावर अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी केलेल्या या भीषण हल्ल्यात 25 वर्षीय अर्जितसिंघ चव्हाणचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यावेळी अर्जितसिंघ चव्हाण हा धुरधंर २ चित्रपट पाहण्यासाठी आला होता, मात्र हल्लेखोरांनी त्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना घेराव घालून हे कृत्य केलं. (Nanded Crime News)
Nanded Crime News: चित्रपट संपल्यानंतर तो घरी जाताना त्याच्यावर हल्ला
नांदेड मध्ये तिहेरी हत्याकांड जरी घडलं असलं तरी याला पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे घटनेमधील हल्लेखोर आणि मयत असलेला अर्जितसिंघ चव्हाण यांच्यावर देखील गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत अर्जितसिंघ चव्हाण याच्यावर नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले अर्जित हा धुरंदर टू चित्रपट पाहण्यासाठी ई-स्क्वेअर ला रात्री गेला होता पहाटे सव्वा एक वाजता चित्रपट संपल्यानंतर तो घरी जाताना त्याच्यावर हल्ला करत त्याला तिथेच मारलं. (Nanded Crime News)
Nanded Crime News: अर्जितसिंघ चव्हाण हा सदा देशमुखच्या गॅंगचा मेंबर
हल्ल्यामध्ये साईलाला हा अनिल पंजाबी याचा म्होरक्या होता, अनिल पंजाबी जेलमध्ये गेल्यानंतर तेव्हापासूनच गॅंग लीडरच्या भूमिकेत साईलाला त्याची गॅंग चालवत होता, साईलाला वर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत एमपीडीएची सुद्धा त्याच्यावर कारवाई होती सदा देशमुखचा खून हा साईलालानेच केला होता, असा संशय अर्जितसिंघ चव्हाण याला होता तेव्हापासूनच अर्जितसिंघ चव्हाण हा साईलालाच्या मागावर होता, अर्जितसिंघ चव्हाण हा सदा देशमुखच्या गॅंगचा मेंबर होता. (Nanded Crime News)
Nanded Crime News: शासकीय रुग्णालयातच आवेशवर खंजिराने वार
अर्जितसिंघ चव्हाण सोबत संभाजी पाटील व नागेश्वर लडे हे होते तर साईलालाच्या गॅंगमधून अरबाज व आवेश हे समोरा समोर येत तलवार व खंजीराने एकमेकांवर वार करत अर्जितसिंघ चव्हाणला जखमी केले व त्यातच त्याचा मृत्यू झाला. अर्जितसिंघ चव्हाणवर झालेला हल्ला पाहता अर्जितसिंघ चव्हाणसोबत आलेल्या संभाजी पाटील व नागेश लड्डे यांनी अरबाज आणि आवेशवर हल्ला चढवत त्याला मारले, अरबाजचा मृत्यू हा जागेवरच झाला तर आवेशचा मृत्यू हा शासकीय रुग्णालयात झाला, आवेश इकडे आल्याची माहिती अर्जितच्या भावाला मिळाली आणि त्याने शासकीय रुग्णालयातच आवेशवर खंजिराने वार करत त्याच्यावर हल्ला केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या डोळ्या एकमेकांसमोर उभ्या टाकल्या आणि या टोळी युद्धातच या तिघांचाही रक्तरंजित कहाणीने अंत झाला. (Nanded Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.