DC vs MI: टीम इंडियाबाहेर असूनही दीपक चहरची कमाल कामगिरी! स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री करत या दिग्गजाचा विक्रम केला उध्वस्त

शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात (MI vs DC), मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने (Deepak Chahar) एक खास विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएलच्या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत चहर आता एका विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे. या सामन्यात त्याने स्टार फलंदाज केएल राहुलला (1 धाव) स्वस्तात बाद केले. यासह आयपीएल इतिहासात पहिल्याच षटकामध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दीपक चहर सध्या भारतीय संघात नसला, तरी त्याच्याकडे आजही सुरुवातीलाच विकेट घेण्याचे (स्ट्राइक-बॉलर) जबरदस्त कौशल्य आहे, हे त्याने सिद्ध केले.

दीपकने आयपीएलमध्ये आतापर्यंत 15 वेळा पहिल्याच षटकामध्ये विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने प्रवीण कुमारला (15 विकेट्स, 89 सामने) मागे टाकत चौथे स्थान मिळवले आहे. या यादीत संदीप शर्मा (13 विकेट्स) पाचव्या, तर झहीर खान (12 विकेट्स) सहाव्या क्रमांकावर आहे. मात्र, या बाबतीत न्यूझीलंडचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू ट्रेंट बोल्ट (Trent Boult) अव्वल स्थानी आहे.

पहिल्याच षटकामध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

विकेट्स गोलंदाज सामने

32 ट्रेंट बोल्ट 104

27 भुवनेश्वर कुमार 136

16 दीपक चहर 84

15 प्रवीण कुमार 89

13 संदीप शर्मा 78

12 झहीर खान 65

Comments are closed.