बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात 19 उमेदवारांनी शड्डू ठोकला, कोण-कोण रिंगणात?
Baramati Byelection 2026 Candidates: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या (Baramati Bypoll 2026) निमित्ताने येथील राजकारणाला पुन्हा एकदा रंगत आली आहे. अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत. येत्या 23 एप्रिल रोजी बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. तर 4 मे रोजी बारामती पोटनिवडणुकीचा (Baramati Byelection 2026) निकाल जाहीर होईल. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून 6 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच बारामती पोटनिवडणुकीसाठी तब्बल 19 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) हेदेखील बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, अद्याप ते कोणत्या पक्षाकडून लढणार की अपक्ष रिंगणात उतरणार, हे निश्चित झालेले नाही. याशिवाय, काँग्रेसकडूनही (Congress) आपला उमेदवार रिंगणात उतरवला जाऊ शकतो. सध्याची परिस्थिती पाहता बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात 20 पेक्षा जास्त उमेदवार असण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics News)
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, असा भाजपचा प्रयत्न होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी इच्छाही बोलून दाखवली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ही निवडणूक बिनविरोध न होता सुनेत्रा पवार यांच्याविरोधात 20 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी न होता काहीशी रंगतदार होऊ शकते. सध्याच्या घडीला सुनेत्रा पवार यांचे पारडे जड मानले जात असले तरी लक्ष्मण हाके रिंगणात उतरल्यास बारामतीच्या पोटनिवडणुकीत रंजक घडामोडी पाहायला मिळू शकतात.
Baramati News: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत
सतीश कदम (हिंदुस्थान जनता पार्टी)
सागर भिसे ( अपक्ष )
सागर भिसे ( अपक्ष )
राघू घटुकडे ( न्यू राष्ट्रीय समाज पार्टी )
गजानन गवळी ( अपक्ष )
त्रिशाला कांबळे ( अपक्ष )
दिलीप अळोणी ( अपक्ष )
दत्तात्रेय बेदरे ( अपक्ष )
अरूण निटुरे ( राष्ट्रीय किसान बहूजन पार्टी )
मिथून आटोळे ( अपक्ष, बारामती )
रझाक मुलाणी (अपक्ष)
संदीप खरात ( अपक्ष )
विलास होळकर ( अपक्ष, बारामती )
अभिजीत बिचुकले ( अपक्ष )
अभिजीत बिचुकले ( अपक्ष )
अनिल तुपे ( अपक्ष )
संकेत गावडे ( अपक्ष, बारामती )
दादा थोरात ( अपक्ष, बारामती )
अभिजीत कांबळे ( अपक्ष, बारामती )
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.