अचानक कॅप्टन बदलल्याने मुंबईमध्ये खळबळ, गाडी रुळावरून घसरलीच हार्दिक पांड्या कधी परतणार?
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 : हार्दिक पांड्या आजारी असल्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादव याने सांभाळली होती. मात्र त्या लढतीत मुंबई इंडियन्सला 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या मैदानात नेमकी कधी पुनरागमन करणार? (Hardik Pandya Return Update Marathi News)
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी नाणेफेकच्या वेळी सूर्यकुमार यादवने पांड्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. त्याने सांगितले की हार्दिक पांड्यांची तब्येत ठीक नाही आणि तो स्वतःला बरे वाटत नसल्यामुळे पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. त्यामुळेच त्याला त्या सामन्यात खेळता आले नाही.
हार्दिक पांड्या नेमकं कधी पुनरागमन करणार? (Hardik Pandya Mumbai Indians IPL 2026)
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्याची प्रकृती फार गंभीर नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यामागचं कारण म्हणजे स्पर्धा अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि मुंबई इंडियन्स संघ आपल्या कर्णधार व स्टार ऑलराउंडरबाबत कोणताही मोठा धोका पत्करू इच्छित नाही. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, हार्दिक पांड्या 7 एप्रिलला गुवाहाटी येथे होणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात परतू शकतात. दिल्लीतील सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ पुढील सामन्यासाठी आपल्या पुढील स्थळी रवाना झाला आहे. (Hardik Pandya Return Update)
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना कधी? (Hardik Pandya Mumbai Indians IPL 2026)
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 2 सामने खेळले असून त्यापैकी 1 विजय आणि 1 पराभव असा त्यांचा निकाल आहे. पहिल्या सामन्यात त्याने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 221 धावांचे मोठे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांना 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. सध्या गुणतालिकेत मुंबई 2 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
आता मुंबईचा पुढील सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. रियान परागच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ दमदार फॉर्ममध्ये असून त्यांनी आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आधी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सवर विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना 7 एप्रिल रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. (Hardik Pandya Mumbai Indians IPL 2026)
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.