राहुरी विधानसभेसाठी मविआकडून कोण लढणार? तिढा कायम, राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु
राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक पार पडणार आहे. एकीकडे भाजपने अक्षय कर्डीले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्याने मविआतील संभ्रम कायम आहे. महाविकास आघाडीत राहुरी विधानसभेचा तिढा अद्याप कायम आहे. राहुरी विधानसभेची पोटनिवडणुकसाठी मविआ चा उमेदवार कोण? याबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची पक्षकार्यालयात बैठक सुरु आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेले उमेदवार मातोश्रीवर
दरम्यान, राहुल विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी माजी आमदार प्राजक्त तनपूरे हे इच्छुक आहेत. तसा त्यांनी प्रचार देखील सुरु केला आहे. काँग्रेसकडून ही उमेदवारी देण्याची तयारी सुरु आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही इच्छुक उमेदवार मातोश्रीवर भेट देऊन गेले आहेत. त्यामुळं नेमका या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याचा तिढा कायम आहे. सध्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) कार्यालयात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे ही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्राजक्त तनपुरे हे राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नेमके कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार?
शनिवारी अहिल्यानगरच्या राष्ट्रवादी भवनात झालेल्या पदाधिकारी बैठकीला प्राजक्त तनपुरे उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सोबतच तनपुरे हे अपक्ष उमेदवारी करतील अशी मतदारसंघात चर्चा सुरू आहे, त्या चर्चेला पदाधिकारी बैठकीत त्यांच्या अनुपस्थितीने बळ मिळाले आहे. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, “मी तनपुरे यांच्या संपर्कात आहे, योग्य वेळी योग्य डाव टाकू” असं म्हंटलं आहे. मात्र तनपुरे यांनी वेगळा निर्णय घेतल्यास ठाकरे गट आणि काँग्रेस निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने राहुरीत महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? अशी राजकिय चर्चा सुरू झाली आहे.
संभाव्य उमेदवार / फिक्स उमेदवार
भाजप-अक्षय कर्डीले, भाजप
राष्ट्रवादी SP / अपक्ष – प्राजक्त तनपुरे
शिवसेना ठाकरे- रावसाहेब खेवरे , माजी जिल्हा प्रमुख
काँग्रेस – बाळासाहेब आढाव , तालुका अध्यक्ष / साहेबराव म्हसे, माजी बाजार समिती सदस्य
एआयएमआयएम – डॉ.परवेज असरफी, जिल्हा अध्यक्ष
अपक्ष- गोविंद मोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य (कर्डीलेंचे कट्टर विरोधक)
वंचित बहुजन आघाडी : अनिल जाधव
महत्वाच्या बातम्या:
Rahuri By Election : राहुरीत प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष, मविआत सगळेच इच्छुक
आणखी वाचा
Comments are closed.