पंतचा पॉवरफुल पंच! हैदराबादच्या बालेकिल्ल्यात लखनऊचा राडा, विजयानंतर टीमच्या मालकाला अश्रू अनाव

IPL 2026 मध्ये LSG ने SRH चा 5 विकेट्सनी पराभव केला: आयपीएल 2026 मधील दहाव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात लखनऊने 5 गडी राखून या मोसमातील आपला पहिला विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 156 धावा उभारल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार ऋषभ पंतने जबाबदारी स्वीकारली आणि शेवटच्या षटकांमध्ये लखनऊने 5 विकेट्स राखून हा सामना जिंकला.

पंतने विजयी चौकार मारला अन् गोयंकांचा बांध फुटला (Sanjiv Goenka in tears after LSG win)

सामना संपताच जेव्हा लखनऊच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले, तेव्हा स्टेडियमच्या गॅलरीमध्ये एक असे दृश्य पाहायला मिळाले ज्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले. लखनऊचे संघमालक संजीव गोयंका विजयानंतर चक्क भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

26 धावांवर 4 विकेट्सनंतर क्लासेन अन् रेड्डीने चेहरामोहरा बदलला

हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली होती. पॉवरप्लेमध्ये (पहिल्या 6 षटकांत) फक्त 22 धावा, तर 10 षटकांत अवघ्या 35 धावा संघ 100 च्याही पुढे जाईल का, अशी शंका निर्माण झाली होती. पण हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी पाचव्या विकेटसाठी 116 धावांची अफलातून भागीदारी करत सामन्याचा चेहरामोहरा बदलला. क्लासेनने 41 चेंडूत 62 धावांची दमदार खेळी करत 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर रेड्डीने 33 चेंडूत 56 धावा करत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या जोरावर संघाला भक्कम धावसंख्या उभी करून दिली. 26 धावांवर 4 विकेट्स गमावल्यानंतर हैदराबादने 156 धावा केल्या, हा आयपीएल इतिहासातील अशा परिस्थितीतला सर्वात मोठा स्कोर ठरला.

मोहम्मद शमीचा ऐतिहासिक शब्दलेखन

दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या मोहम्मद शमी याने गोलंदाजीत कमाल करत इतिहास रचला. त्याने 4 षटकांत फक्त 9 धावा देत 2 बळी घेतले आणि 2.20 च्या अफलातून इकॉनॉमीने गोलंदाजी केली. या कामगिरीसह शमी लखनऊसाठी 4 षटकांच्या स्पेलमध्ये सर्वात कमी धावा देणारे गोलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम कृणाल पांड्याच्या नावावर होता. त्याने 2022 मध्ये 4 षटकांत 11 धावा (2.75 इकॉनॉमी) दिल्या होत्या.

पंतचा पॉवरफुल पंच!

धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला मिचेल मार्श (14 धावा) स्वस्तात बाद झाला, मात्र एडन मार्करमने 27 चेंडूत जलद 45 धावा करत डावाला गती दिली. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने एका बाजूने किल्ला लढवत 50 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 68 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. मध्यफळीत आयुष बदोनी (12) आणि अब्दुल समद (16) यांनी छोटेखानी योगदान दिले, तर निकोलस पूरन केवळ 1 धाव काढून धावबाद झाला.

हे ही वाचा –

Mohammed Shami SRH vs LSG IPL 2026 : मोहम्मद शमीने रचला इतिहास… मालकही अवाक्; गोएंकाच्या रिॲक्शनने वेधले सर्वांचं लक्ष, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.