आधी हुलकावणी, मग शिकार! विराट कोहलीला संताप अनावर; शिवम दुबेने एका झटक्यात हिशोब चुकता केला, ने
विराट कोहली-शिवम दुबे RCB विरुद्ध CSK IPL 2026 : गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि पाच वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल 2026 चा सर्वात मोठा सामना खेळला जात आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या 11 व्या सामन्यात असाच एक हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला, जिथे किंग कोहलीच्या एका विकेटने संपूर्ण स्टेडियमला सुन्न करून सोडलं.
खलील अहमदचा चेंडू अन दुबेची चोक (RCB vs CSK शिवम दुबे विराट कोहली कॅच ड्रॉप)
डावाच्या सुरुवातीला खलील अहमदच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या खालच्या बाजूला लागून मिड-ऑनच्या दिशेने हवेत उडाला. शिवम दुबे मागे धावत गेला, चेंडू जवळ पोहोचला, पण मोक्याच्या क्षणी चेंडू त्याच्या हातातून निसटला. विराट कोहलीला नशीबाची साथ मिळाली आणि त्याला जीवदान मिळाले.
𝗬𝗢𝗨 𝗗𝗢𝗡'𝗧 𝗗𝗥𝗢𝗣 𝗧𝗛𝗢𝗦𝗘! 😬💥
सरळ वर, संधी हवेत… आणि दुबेने ते उडवले! 😮💨
कोहलीला मोठी लाइफलाइन मिळते, असे क्षण तुम्हाला त्रास देऊ शकतात! 👀#TATAIPL 2026 | #RCBvCSK | आता थेट 👉 https://t.co/2TGcMINdez pic.twitter.com/hacsdiuR7P— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 5 एप्रिल 2026
अखेर अंशुल कंबोजच्या जाळ्यात फसला, नेमकं काय घडलं? (Virat Kohli out catch by Shivam Dube)
मात्र, हे नशीब फार काळ कोहलीच्या सोबतीला नव्हते. अंशुल कंबोजच्या जाळ्यात तो फसला. कोहली आक्रमक पवित्रा घेत खेळण्यासाठी खेळपट्टीच्या पुढे सरसावला. कंबोजने त्याची चाल ओळखून हार्ड लेंथवर चेंडू टाकला, ज्याला अतिरिक्त उसळी मिळाली. कोहलीने पुल मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून लाँग-ऑनच्या दिशेने उडाला. यावेळी शिवम दुबेने कोणतीही चूक केली नाही. त्याने चेंडूवर नजर टिकवून ठेवली आणि झेल टिपला. विराट कोहली लयीत दिसत होता, त्याने 2 चौकार आणि 1 खणखणीत षटकारही खेचला होता. पण 28 धावा तो आऊट झाला.
दुसऱ्या प्रयत्नात विराट कोहली मिळाल्याने शिवम दुबेसाठी एक मोबदला👏#ShivamDube #विराटकोहली #विराट #किंगकोहली pic.twitter.com/UuWPc4DiSN
— शिवमकोळी (@Shivamkolisrki1) 5 एप्रिल 2026
विराट कोहलीला संताप अनावर
आउट होताच विराट कोहलीचा पारा चढला. बॅटवर चेंडू योग्य न लागल्याचा आणि मिळालेल्या संधीचा फायदा उठवता न आल्याचा संताप त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. रागाच्या भरात काहीतरी पुटपुटत आणि हवेत बॅट आपटत विराट पॅव्हेलियनकडे परतला.
सुटकेचा नि:श्वास 😮💨
🎥 शिवम दुबे यांनी दुरुस्ती केली #CSK विराट कोहलीची बहुमोल विकेट मिळवा 💛
अपडेट्स ▶️ https://t.co/PkhPvxcU44#TATAIPL | #खेलबिंदास | #RCBvCSK pic.twitter.com/aLGlJpEePD
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 5 एप्रिल 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.