मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे

Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीय. जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झालेला असतानाच आता जैन मुनी निलेशचंद्र विजय (Jain Muni Nileshchandra) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि मंत्री, भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांची तुलना केल्याने वाद उफाळून आला आहे. नितेश राणेंची उंची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखीच आहे, असं विधान जैन मुनी निलेशचंद्र यांनी केलं. निलेशचंद्र विजय यांच्या या विधानावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी समाचार घेतला.

जैन मुनींचे डोकं सडले आहे का?, यांचे रक्त बदलले आहे का?, या जैन मुनी यांना फटके खायचे आहेत का?, असे सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केले. तसेच आमच्या देवतावर असे बोलत असाल तर आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. तसेच जैन बांधवांना माझं आवाहन आहे की, तुम्ही चांगले लोक आहात. या मुनींचे तुम्ही कान उपटा, असंही मनोज जरांगे म्हणाले. (Manoj Jarange Patil On Jain Muni Nileshchandra)

मनोज जरांगेंच्या विधानावर जैन मुनी निलेशचंद्र काय म्हणाले? (Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil)

मी सर्व धर्मांचं काम करतो. मी सनातनी आहे. मी गोरक्षणाचं काम करतो. मनोज जरांगे यांनी काहीतरी गैरसमज झाला असेल, असं निलेशचंद्र म्हणाले. तसेच फटके मारायचे असतील तर त्यांना मारा…फटके मारायचे असतील तर मुंब्रा हिरवा करणाऱ्यांना मारा, असं प्रत्युत्तर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिलं. (Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil)

जैन मुनी निलेशचंद्र नेमकं काय म्हणाले होते? (जैन मुनी नीलेशचंद्र)

एका सार्वजनिक कार्यक्रमात नितेश राणे यांच्या उपस्थितीत बोलताना जैन मुनी यांनी नितेश राणेंचं कौतुक केलं. मात्र यावेळी नितेश राणेंची उंची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखीच आहे, असं निलेशचंद्र म्हणाले. तसेच नितेश राणे यांनी केवळ मंत्रीच नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवं, अशी इच्छाही निलेशचंद्र यांनी व्यक्त केली. नितेश राणेंची भूमिका ही स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच आक्रमक असल्याचं विधानही निलेशचंद्र यांनी यावेळी केलं.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार

आणखी वाचा

Comments are closed.