Mumbai crime news – पंतप्रधानांच्या नावाने शुभेच्छा पत्र पाठवून मागितली खंडणी; दोघांना रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीचे शुभेच्छा पत्र पाठवून चार लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. तौसिफ पटेल आणि सिद्धीनाथ पांडे अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार या समाजसेविका आहेत. त्यांची एक एनजीओ आहे. ती एनजीओ गरीब मुलांना शैक्षणिक, अनाथाश्रमाला मदत करते. एका कार्यक्रमा दरम्यान त्यांची ओळख त्या दोघांशी झाली. ओळखीनंतर त्याने नंबर शेअर केले होते. गेल्या महिन्यात तौसिफने त्याना एक व्हॉइस नोट पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छांचे पत्र हवे का, याबाबत विचारणा केली. त्याकडे सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. काही वेळानंतर त्यांना पुन्हा व्हॉइस नोट पाठवून शुभेच्छा पत्र पाठवले. पाठवलेले ते शुभेच्छा पत्र खरे असून ते थेट पंतप्रधान कार्यालयातून पाठवले जाते, असे सांगितले. त्यासाठी त्यांना काही चार्ज द्यावा लागेल, असे सांगून त्यांच्याकडे चार लाखांची मागणी केली. गेल्या महिन्यात त्यांना शुभेच्छा पत्र पाठवले गेले. त्यानंतर तक्रारदाराला वारंवार संपर्क करून शुभेच्छा पत्राबाबत पैशांची मागणी करण्यात आली.

वरळीत रंगेहाथ पकडले

याप्रकरणी तक्रारदाराने वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोघा विरोधात गुन्हा नोंद केला. या गुह्याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपवली. तपास हाती येताच पोलिसांनी दोघांना खंडणीची रक्कम घेण्यासाठी वरळी येथे बोलावले. ठरल्यानुसार ते दोघे रक्कम घेण्यासाठी आले असता रक्कम घेताना त्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Comments are closed.