Yoga For Fertility : आई बाबा बनण्यात येतोय अडथळा? ही योगासने ठरतील वरदान
सध्याच्या धकाधकीचं रुटीन, चुकीचा आहार, अपुरी झोप आणि अन्य कारणांमुळे इनफर्टिलिटीचे प्रमाण वाढत आहे. इनफर्टिलिटी म्हणजे कमी प्रजननक्षमता. ही समस्या पुरुष आणि महिला दोघांनाही जाणवत आहे. यामुळे गर्भधारणेत अडचणी येतात. आपल्या आजुबाजूला असे अनेक कपल आहेत ज्यांना बाळ होत नाही. तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत कपलने लाईफस्टाईलमध्ये बदल करणे आवश्यक आहे. वेळीच लाईफस्टाईलमध्ये सुधारणा केल्यास महिला आणि पुरुषांमध्ये प्रजननाचे प्रश्न नक्कीच कमी होऊ शकतात. आई बाबा बनण्यात अडचणी येत असतील तर कपलने योगाभ्यास करणे गरजेचे आहे. जोडप्याने नियमित योगासने केल्यास त्याचं आईबाबा होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
योग केल्याने प्रजनन क्षमता कशी वाढते?
नियमित योग केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते, हार्मोन्स संतुलित होतात आणि स्ट्रेस कमी होतो, ज्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांमधील प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. विशिष्ट योगासने पेल्विक क्षेत्रातील रक्तप्रवाह सुधारून गर्भाशयाचे आरोग्य चांगले ठेवतात आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणेची शक्यता वाढवतात.
पश्चिमोत्तासन (बसलेले पुढे वाकणे)
या आसनात मानेपासून पायांच्या घोट्यापर्यंतच्या सर्व पाठीमागच्या शरीराच्या भागास ताण मिळतो त्यामुळे या आसनाला पश्चिमोत्तासमन म्हणतात. हे आसन पाठ आणि कंबरेचे स्नायू, हिप्स आणि हॅमस्ट्रिंगला स्ट्रेच करण्यास मदत करतो. ज्यामुळे प्रजनन व्यवस्थेला फायदा होतो.
भुजंगासन (कोब्रा पोझ)
भुजंगासन केल्याने ओटीपोटात ताण निर्माण होतो. ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते.
बद्धकोनासन (Butterfly Pose)
बद्धकोनासनाच्या सरावामुळे मांड्याच्या आतील भाग, हिप्स, गुडघे आणि जननेंद्रियाच्या स्नायू ताणले जातात. या आसनामुळे प्रसुती प्रक्रिया सुलभ होते.
भ्रामरी प्राणायाम (मधमाशीचा श्वास)
भ्रामरी प्राणायामामुळे शरीरातील इतर अवयव योग्यरित्या काम करतात. श्वास घेण्याची क्षमता यामुळे सुधारते. स्ट्रेसपासून मुक्ती मिळते.
जानुशीर्षासन (डोक्यापासून गुडघ्यापर्यंत पोझ)
जानूशीर्षासनद्वारे काल्वस आणि हॅमस्ट्र्रिंग्स ताणले जातात. तसेच संपूर्ण शरीरातील स्नायूंना सहज आराम मिळतो.
बालासना (मुलाची पोझ)
बालासन रिकाम्या पोटी करावे. ही मुद्रा गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाच्या स्थितीसारखीच आहे. यामुळे मांडी, गुडघे, पाठ आणि हिप्स या अवयवांचे स्नायू स्ट्रेच होतात.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. वैद्यकीय समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
हेही वाचा – Early Menopause Causes : भारतीय महिलांमध्ये लवकर मेनोपॉजचा वाढता धोका
Comments are closed.