Ratnagiri News – देवरुखमध्ये सापडली अतितीव्र कुपोषित बालिका, ग्रामीण रुग्णालयातील केंद्रात उपचार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

देवरुख शहरातील कांजीवरा अंगणवाडी येथील श्रीनिधी मारुती दानोळे ही बालिका अतितीव्र कुपोषित या श्रेणीत आढळून आली आहे. या बालिकेला देवरुख ग्रामीण रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे.

कुपोषित बालिकेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप माने व आरबीएसके पथक क्र 1 चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव धामणे धामणे, डॉ. पावरी तसेच औषधनिर्माता कांचन, परिचारिका टाकळे या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे तिला देवरुख ग्रामीण रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्र येथे 27 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. तिच्या पालकांना रोजचा आहार व औषोधोपचार याबाबत माहिती देण्यात आली. या बालिकेला आरोग्य केंद्रात दाखल करत तिच्यावर उपचार करण्यात आले. तिच्या वजनात वाढ झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले.

Comments are closed.