भारताचे दोन हिरे, जिगरी दोस्ती, ICC पुरस्कारासाठी भिडणार; दक्षिण आफ्रिकन खेळाडूदेखील दावेदार, क
संजू सॅमसन जसप्रीत बुमराह आयसीसी पुरस्कारासाठी नामांकित: संजू सॅमसनसाठी (Sanju Samson) आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 खूपच धमाकेदार ठरला. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं. मात्र, संधी मिळाल्यानंतर सुरुवातीला त्याची कामगिरी खास नव्हती. पण जसजसा टूर्नामेंट पुढे सरकत गेला, तसतसा संजूने जबरदस्त फलंदाजी करत सर्वांना आश्चर्यचकित केलं. दरम्यान, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने त्याची ‘प्लेयर ऑफ द मंथ’साठी निवड केली आहे. या पुरस्कारासाठी त्याची टक्कर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि दक्षिण आफ्रिकेच्या कोनोर एस्टरहुइझेन (Conor Esterhuizen) यांच्याशी आहे.
चे दोन तारे #T20WorldCup आणि एक प्रभावी युवा फलंदाज मार्च 2026 च्या ICC पुरूष खेळाडूच्या मंथ पुरस्कारासाठी स्पर्धेत आहे 💪
अधिक वाचा 👇https://t.co/OIFnI6j6hC pic.twitter.com/LKfn8BEtxq
— ICC (@ICC) 6 एप्रिल 2026
नॉकआउट सामन्यांमध्ये संजूचा जलवा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो सामन्यात संजू सॅमसनने नाबाद 97 धावांची शानदार खेळी करत भारताला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही त्याने 89 धावांची दमदार खेळी केली. फाइनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धही त्याचा फॉर्म कायम राहिला आणि त्याने पुन्हा 89 धावा करत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. या सलग तीन नॉकआउट सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावल्यामुळे संजूला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ हा किताबही मिळाला.
मार्च महिन्यातील जबरदस्त कामगिरी
मार्च महिन्यात संजू सॅमसनने अफलातून फलंदाजी करत 137.50 च्या सरासरीने आणि 199.27 च्या स्ट्राईक रेटने एकूण 275 धावा केल्या. त्यामुळेच त्याची ‘प्लेयर ऑफ द मंथ’साठी निवड झाली आहे.
जसप्रीत बुमराह × संजू सॅमसन 🇮🇳
बुमराह आणि सॅमसन यांना मार्च 2026 साठी ICC प्लेअर ऑफ द महीनासाठी नामांकन. pic.twitter.com/fDwA6PYd3f
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 6 एप्रिल 2026
बुमराहचीही प्रभावी गोलंदाजी
दुसरीकडे, जसप्रीत बुमराह यानेही या विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावली. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने 2 बळी घेतले, तर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतही त्याने प्रभावी गोलंदाजी करत 1 विकेट घेतली. फाइनलमध्ये मात्र बुमराहने कमाल केली, 4 षटकांत फक्त 15 धावा देत 4 विकेट घेतल्या आणि भारताच्या विजयात निर्णायक योगदान दिलं.
कोनोर एस्टरहुइझेन ठरला तिसरा दावेदार
या दोघांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या कोनोर एस्टरहुइझेन यालाही आयसीसीने नामांकन दिलं आहे. त्यानेही मार्च महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करत या शर्यतीत स्थान मिळवलं आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.