Weird Funeral Rituals : जगभरातील अंत्यसंस्कारांच्या विचित्र पद्धती, वाचून बसेल धक्का
जन्म घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या धर्मातील प्रथेनुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. प्रत्येक धर्म आणि संप्रदायामध्ये अंत्यसंस्काराचा वेगळा असा विधी आहे. भारतात त्या त्या समाजातील प्रथेप्रमाणे दहन किंवा दफन केले जाते. परंतू जगभरात अंत्यसंस्कारांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकीत करू शकतात.
पापुआ न्यू गिनी
आफ्रिकेतील पापुआ न्यू गिनी या देशात अंत्यविधीला घेऊन विचित्र प्रथा आहेत. या जमातीत मृत्यूनंतर मृतदेह बांबूच्या खांबावर उंच ठिकाणी किंवा डोंगराळ भागात लटकावून जतन केला जातो, जेणेकरून तो त्यांच्या पुढच्या पिढींसाठी आठवण राहील.
दक्षिण कोरिया
दहन केल्यानंतर उरलेल्या राखेतून मोती बनवले जातात. इथे मोती गुलाबी किंवा काळ्या रंगाचे असतात, ज्यांना Death Beads असे म्हणतात. हे मोती घरात शोपीससाठी वापरले जातात.
मादागास्कर
मादागास्कर येथे अंत्यसंस्काराची विचित्र प्रथा प्रचलित आहे. येथे मृतदेह पूरून सात वर्षानंतर पुन्हा एकदा ती कबर खोदून सर्व हाडे बाहेर काढली जातात. त्यानंतर ती नव्या कापडात गुंडाळून त्याची पूजा केली जाते. याची दुर्गंधी येऊनही मद्यपान करत मृत व्यक्तीच्या आठवणीत हा दिवस साजरा केला जातो.
घाना
घाना देशात व्यक्तीच्या व्यवसायानुसार शवपेटी बनवली जाते. जसे की एखाद्या मच्छीमाराचा मृत्यू झाला असेल तर माशाची आकाराची शवपेटी बनवली जाते.
फिलीपिन्स
फिलीपिन्समध्ये काही जमातीत प्रेताला नवे कपडे घालून खूर्चीत बसवले जाते. त्याच्या तोंडात सिगारेट दिली आणि पुढील क्रियाकर्म केले जाते. तर काही जमातीत मृताच्या डोळ्यावर पट्टी बांधून मृतदेह घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच पुरला जातो.
मनिला
मनिलाजवळ कॅव्हिटिनो इथे मृतदेह झाडाच्या खोडात दफन केला जातो. फक्त यासाठी माणूस मरण्यापूर्वीच त्याने त्याच्यासाठी झाड निवडायचं असतं.
तिबेट
तिबेट देशात बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. इथे मृत व्यक्तीचे शरीर तुकडे करून डोंगरावरून टाकून देतात, जे पक्षी प्राणी खातात.
हेही वाचा – Expensive Tea : हा आहे जगातील सर्वात महागडा चहा, ज्याची किंमत लाखोंच्या घरात
Comments are closed.