Summer Baby Care -उन्हाळ्यातलं बेबी केअर

उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा मोठ्यांप्रमाणेच लहान बाळांनाही त्रास होतो. कारण यादिवसात उष्णतेमुळे डिहायड्रेशन, घामोळे, ताप यांसारख्या समस्या उद्भवतात. पण मोठ्यांना काय त्रास होतो हे ते सांगू शकतात. पण लहान बाळांना मात्र सांगता येत नाही. त्यामुळे बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी काय कराव ते बघूया.

डिहायड्रेशन टाळण्यासाठी बाळाला पुरेसं पाणी आणि दूध द्यावं

6 महिन्यांखालील बाळांसाठी फक्त आईचं दूध पुरेसं असतं.

तर 6 महिन्यांवरील बाळांना पाणी, नारळपाणी, फळांचा रस (मर्यादित प्रमाणात) देऊ शकता.

उन्हाळ्यात हवेत उष्मा असतो, वाराही गरम असतो. त्यामुळे घाम येतो. म्हणूनच बाळाला घट्ट कपडे घालू नयेत. कॉटनचे हलके आणि सैल कपडे घालावे.

सिंथेटिक कपडे टाळावेत.

बाळाला थेट उन्हात घेऊन जाणे टाळावे. विशेषतः दुपारी 12 ते 4 दरम्यान.

जर बाहेर जाणे गरजेचेच असेल तर टोपी, छत्री घ्यावी. किंवा कापडाने बाळाला गुंडाळावे.

घरात पंखा/AC वापरावा, पण थंड हवा थेट बाळावर येणार नाही याची काळजी घ्यावी.

बाळाला दिवसातून 1–2 वेळा कोमट पाण्याने आंघोळ घालावी.

यामुळे बाळाला फ्रेश वाटते. घामोळे कमी होतात.

घामोळे टाळण्यासाठी बाळाची त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी.

गरज असल्यास बाळांसाठी सौम्य पावडर वापरा.

मोठ्या बाळांना हलकं, पचायला सोपं अन्न द्या (उदा. खिचडी, फळं, दही).

जर बाळ खूप रडत असेल, तोंड कोरडं असेल, लघवी कमी होत असेल तर सावध रहा. बाळाच्या शरीरातील पाणी कमी असल्याची ही लक्षमे असू शकतात.

अशी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Comments are closed.