बांगलादेश क्रिकेटमध्ये गोंधळ! टी20 वर्ल्ड कपनंतर वादाची ठिणगी, 4 जणांनी दिले राजीनामे
टी-२० वर्ल्ड कप २०२६ पूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्ड प्रचंड वादात सापडले होते. त्यांनी आपला संघ भारतात खेळण्यासाठी पाठवण्यास नकार दिला होता आणि श्रीलंकेत खेळण्याची मागणी केली होती; मात्र आयसीसीने (ICC) त्यांची ही मागणी फेटाळून लावली होती. याच कारणामुळे बांगलादेशला टी-२० वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली नाही. त्या संपूर्ण प्रकरणात बांगलादेश सरकारचा मोठा हस्तक्षेप पाहायला मिळाला होता. आता याच संदर्भात एक नवा विवाद समोर आला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डामध्ये सातत्याने सरकारचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. याच हस्तक्षेपामुळे आता ‘बीसीबी’च्या (BCB) चार पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांचे विधान समोर आले असून त्यांनी संकेत दिले आहेत की, जरी सरकार हस्तक्षेप करत असले तरी ते आपले पद सोडणार नाहीत. त्यांना बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पुढे नेण्याची इच्छा आहे. मात्र, अमीनुल हे क्रिकेटमधील सरकारच्या या हस्तक्षेपामुळे अत्यंत निराश आहेत.
Comments are closed.