ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
1. बारामतीत पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवारांची भावनिक साद; म्हणाल्या, मी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पवार साहेबांची सून, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही https://tinyurl.com/58b8m9p2 लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढले अन् आता आकाश मोरेंनी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकला, बारामती पोटनिवडणुकीत चक्रावणारं राजकारण https://tinyurl.com/mp5jyeu8
2. राहुरीत पोटनिवडणुकीसाठी भाजपने शेवटच्या क्षणी डाव टाकला, राधाकृष्ण विखे-पाटील अन् रवींद्र चव्हाणांची प्राजक्त तनपुरेंशी चर्चा; थेट CM फडणवीसांनाच फोन लावून दिला https://tinyurl.com/yc2ezzpn राष्ट्रवादीने राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंची माघार, गोविंद मोकाटेंना उमेदवारी जाहीर https://tinyurl.com/5frp9cw8
3 बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी शेवटच्या क्षणी खेळ फिरवला आहे; बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून लक्ष्मण हाके यांचा राजीनामा, दत्तात्रेय भरणेंनी मन फिरवले https://tinyurl.com/3f7kz3rr राहुरी पोटनिवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी; शेतकरी सेनेच्या रवी मोरेंनी भरला उमेदवारी अर्ज https://tinyurl.com/5n7ucuca
4. अजितदादा गेल्याचं आम्हाला दुःख. त्यामुळे पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी बारामती निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला; काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिला तो त्यांच्या अधिकार; शरद पवारांनी मांडली भूमिका https://tinyurl.com/2pph8yrj
काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीत उमेदवार दिल्यावरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
https://tinyurl.com/4yp7wtts
5. अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, समता पतसंस्थेशी संबंध असण्याची शक्यता; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/38eu3j24 अशोक खरातकडून केबिनमध्ये महिलांचं लैंगिक शोषण; गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, कडक कारवाई व्हायला हवी, म्हणजे देशात असे प्रकार कुठे घडणार नाहीत https://tinyurl.com/5n8jxd7j
6. अशोक खरातचा सीडीआर कुठून आला?; अंजली दमानियांनी ऑन कॅमेरा दाखवलं, ऑडिओ क्लिपही ऐकवली, नंतर भर पत्रकार परिषदेत रडल्या! https://tinyurl.com/323p2f7f अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार; आमदार शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; म्हणाले, त्यांना माहिती कुठून मिळते हे पाहायला पाहिजे https://tinyurl.com/5n77bvxf
7. अशोक खरातविरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल; भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात, कोट्यवधींच्या संपत्तीची चौकशी होणार https://tinyurl.com/42rsrxzj नाशिकमधील अशोक खरात पार्ट 2 ‘रवींद्र एरंडे’च्या अडचणी वाढल्या, आठ पीडितांची ओळख पटली, चार मोबाईल जप्त; तपासात हादरवणारी माहिती https://tinyurl.com/jeayfnjv
८. नांदेड पुन्हा हादरलं, खुनातील आरोपी अन् पोलिसांत चकमक; आरोपी अंकुशच्या पायावर लागली गोळी, रुग्णालयात भरती https://tinyurl.com/bdebn357 छ. संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, जिल्हा परिषद शाळेसमोरच सुरु होते नको ते प्रकार, दोन बहिणींना बेड्या, मुख्य नर्स फरार https://tinyurl.com/cbyxefft
9. शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
https://tinyurl.com/2hvjj87p महिला आरक्षण लागू केल्यास लोकसभेत खासदारांची संख्या 543 वरून 816 होण्याची शक्यता; महाराष्ट्राच्या वाट्याला 72 खासदार, विधानसभेचंही चित्र बदलू शकते https://tinyurl.com/54bc27rp
10. आयपीएलमध्ये आज KKR vs PBKS, पंजाबचा विजयरथ रोखण्याचं कोलकातासमोर आव्हान, तिसरा पराभव टाळण्यासाठी यजमान KKR संघाचे प्रयत्न https://tinyurl.com/2s3zcbmz चेन्नईच्या सलग 3 पराभवांच्या नामुष्कीनंतर CSK कडून MS धोनी मैदानात उतरणार; माहीला फक्त द्यावी लागणार फिटनेस टेस्ट https://tinyurl.com/2p9ry4jv
*एबीपी माझा स्पेशल*
अशोक खरातने चिंचोक्यावर मंत्र लिहून दिला, म्हणाला, तुमचा विजय निश्चित; निवडणुकीत उमेदवारांचं काय झालं?, विजयी की पराभूत?, धक्कादायक माहिती https://tinyurl.com/39uu825b
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! सात धरणांत केवळ 37 टक्के जलसाठा, कोणत्या धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी
https://tinyurl.com/bdcsjjva
*एबीपी माझे Whatsapp चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
Comments are closed.