Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला

Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रवादीतील दिग्गज नेते अर्ज भरतेवेळी उपस्थित होते. बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न महायुतीकडून होत होते. मात्र, काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. त्यात, आज शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 68 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. मात्र, काँग्रेसच्या उमेदवारीवरुन पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे, काँग्रेसचा  महाराष्ट्रात डाऊनफॉल म्हणत त्यांनी काँग्रेसला इशाराही दिलाय. त्यावर, शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यानंतरही काँग्रेसने आकाश मोरे यांना येथून उमेदवारी दिली. आकाश मोरे यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यानंतर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही सुनेत्रा पवारांनी फोन केला होता. मात्र, काँग्रेसने उमेदवार दिल्याने महायुतीमधील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, पार्थ पवार यांनी थेट काँग्रेसला इशाराच दिलाय. पार्थ पवार यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवारांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनी आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली, त्यानंतर दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयावर भूमिका स्पष्ट केली. अशोक खरातपासून ते बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केलं.

Comments are closed.