चंद्रपुरात ‘द बर्निंग कार’चा थरार: धावत्या लक्झरी कारचा काही मिनिटांतच कोळसा
चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील पडोली नजीक आज (06 एप्रिल 2026) दुपारी एकच्या सुमारास धावत्या कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. या अपघातात करोडो रुपयांची आलिशान कार जळून खाक झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ही कार चंद्रपुरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाची असल्याची माहिती आहे. दुपारी प्रवास करत असताना गाडीतून अचानक धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत गाडी तात्काळ रस्त्याच्या कडेला उभी केली आणि ते बाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली, मात्र तोपर्यंत गाडीचा केवळ सांगाडा शिल्लक उरला होता. भररस्त्यात घडलेल्या या ‘द बर्निंग कार’च्या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Comments are closed.