अरविंद केजरीवाल स्वतःची बाजू मांडणार आहेत.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणाची सुनावणी सोमवारी उच्च न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान केजरीवाल यांनी न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्यासमोर एक विनंती करताना आपण स्वत:च आपला युक्तिवाद मांडणार असल्याचे स्पष्ट केले. ‘मी अद्याप कोणालाही माझे मुखत्यारपत्र सादर केलेले नाही.’ असे केजरीवाल यांनी सांगितले. न्यायमूर्ती शर्मा यांनी हा अर्ज नोंदवून घेत पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी निश्चित केली. यासंबंधी त्यांनी सीबीआयला मंगळवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

दारू घोटाळा प्रकरणात केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतर 22 आरोपींना निर्दोष मुक्त करणाऱ्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केजरीवाल सोमवारी सकाळी 11 वाजता पत्नी सुनीता यांच्यासोबत न्यायालयात पोहोचले होते. मात्र, सुनावणी दुपारी 2:30 वाजता सुरू होऊन केवळ 9 मिनिटे चालली.

Comments are closed.