पाहुण्यांचे लक्ष वेधणारी ‘टेबल क्रॉकरी ‘

कुटुंब, नातेवाईक,मित्र परिवार,यांच्यासोबत एकत्र बसून जेवण्याचा आनंदच वेगळा असतो. कारण या व्यक्ती तुमच्या जवळच्या असतात. तुमच्याशी भावनिकरित्या जोडलेल्या असतात. यामुळे जेव्हा ते आपल्या घरी येतात तेव्हा त्यांचे आदरातिथ्य योग्यरितीने कसे होईल याकडे आपले लक्ष असते. अशाप्रसंगी आपण त्यांच्या आवडीनिवडीनुसार खाण्याचे पदार्थ तर बनवतोच पण त्यासोबत तुम्ही ते कसे व कशात सर्व्ह करता हे देखील महत्वाचे असते. त्यासाठी कोणती क्रॉकरी वापरावी ते बघुया.

प्लास्टीक डिनर सेट्स

पूर्वी घराघरात प्लास्टीकचे रंगीबेरंगी डिनर सेट्स वापरले जातं. हे डिनर सेट दिसायला आकर्षक, टीकाऊ आणि फुटण्याची भीती नसल्याने जवळजवळ सगळ्यांच्याच घरात याचा वापर होत असे. त्यातही ज्यावेळी पाहुणे जेवायला येत त्यावेळी हे डिनर सेट वापरले जात. आजही काही घरात हे डिनर सेट वापरले जातात.

कचकड्याचे डिनर सेट

त्यानंतर सेल्युलाइड म्हणजे कचकड्याचे डिझायनर डिनर सेट बाजारात आले. प्लेट, बाऊलच्या किनाऱ्यावरील बारीक नक्षीमुळे प्लेटस, बाऊल आकर्षक दिसत. त्यामुळे जेवणासाठी अनेकांची पसंती याच डिनरसेटला असे.

सिरेमिक डिनर सेट
पण आता सिरेमिकचे हँडपेंटेड प्लेट्स, बाऊल सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. फ्लोरल आणि तुर्किश डिझाइन असलेले हे बाऊल्स आधुनिक आणि पारंपरिक असा सुंदर मिलाफ देतात. यामुळे हा डिनर सेट तुमच्या घरात असायलाच हवा.

सर्व्हिंग प्लेटर्स
मसालेदार, तळलेले पदार्थ सर्व्ह करण्यासाठी लाकडी किंवा मार्बल फिनिश असलेले मोठे प्लेटर्स तुम्ही वापरू शकता. हे सर्व्हिंग ट्रे दिसायला खूप प्रीमियम वाटतात आणि पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतात.

टीपी जेवणाचे टेबल

ज्या दिवशी घरी पाहुणे येणार असतील त्यादिवशी ज्या डायनिंग टेबलावर तुम्ही क्रोकरी सेट करणार आहात तो ही टिपटॉप ठेवावा.

टेबल पूर्णपणे स्वच्छ आणि नीटनेटके असावे.

सुंदर टेबलक्लॉथ किंवा टेबल रनर वापरल्याने टेबल आकर्षक दिसते.

टेबलावर छोट्या फुलदाणीत ताज्या फुलांची सजावट ठेवा.

प्लेट, बाऊल, चमचे आणि ग्लास व्यवस्थित लावा.

नॅपकिन फोल्ड करून सुंदर पद्धतीने ठेवा.

कॅंडल, शोपीस किंवा छोटा डेकोरेटिव्ह आयटम ठेवा.

क्रोकरी, नॅपकिन्स आणि सजावट एकाच थीममध्ये ठेवा.

टेबलावर सौम्य प्रकाश देणारी कॅंडल किंवा लाइट टेबलला अधिक आकर्षक बनवतो

Comments are closed.