सांगली जिल्हा गुन्ह्यांच्या मालिकेने हादरला; 10 किलोमीटरच्या अंतरातील घटना, कवलापूरला वेटरचा, क

सांगली : सांगली जिल्ह्यात खुनांची मालिका (Sangli Crime News) कायम असून काल (सोमवारी,ता ६) एकाच दिवसात खुनाच्या तीन घटनांनी जिल्हा पुन्हा हादरला आहे. कवलापूरला एक आणि कुपवाडला दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. दहा किलोमीटरच्या अंतरात तीन खुनाच्या घटनांमुळे पोलिसही (Sangli Crime News) चक्रावून गेले आहेत. या घटनांमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.(Sangli Crime News)

Sangli Crime News: यात्रेत शिवीगाळ केल्याने कवलापूरमध्ये एकाचा दगडाने ठेचून खून

मिरज तालुक्यातील कवलापूर येथील सिद्धेश्वर यात्रेला सोमवारी पहाटेच्या सुमारास खुनामुळे गालबोट लागले. यात्रेत धक्का लागल्यानंतर वाद होऊन शिवीगाळ केल्यामुळे विश्वास कल्लाप्पा सुतार (वय ३४, रा. विराट हॉटेल, कुमठे फाटा, मूळ रा. भोसे) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार घडला. संशयित रोहित ऊर्फ नवनाथ श्रीरंग नाईक (वय २४, रा. कवलापूर) याला तत्काळ अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विश्वास सुतार हा मूळचा भोसे येथील असून तो कुमठे फाटा येथील विराट हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. तर भोसे येथे त्याची आई राहते. रविवारी रात्री काम आटोपल्यानंतर विश्वास हा हॉटेल मालक रामकृष्ण पाटील यांना सांगून कवलापूर यात्रेसाठी जातो म्हणून बाहेर पडला. मध्यरात्रीनंतरही यात्रेतीलतमाशा सुरूच होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास फिरत असताना मृत विश्वास आणि संशयित रोहित नाईक याचा एकमेकांना धक्का लागला. दोघांमध्ये वाद झाला. विश्वासने रोहितला आईवरून शिवीगाळ केल्याने त्यांच्यात हाणामारी झाली, रोहितने त्याला खाली पाडून दगड उचलून विश्वासच्या डोक्यात घातला. गावातील लोकांनी हल्लेखोर रोहितला पकडून ठेवले. तर १०८ रुग्णवाहिकेस बोलवून घेतले. जखमी विश्वासला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी ८:३० च्या सुमारास विश्वासचा मृत्यू झाला. मृतविश्वासचा मामेभाऊ सूरज भूपाल सुतार (रा. कवलापूर रस्ता, कुपवाड) याला मामाला हा प्रकार कळवला. सूरज याने संशयित रोहित नाईक याच्याविरुद्ध फिर्याद दिली. गावात राहणारे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी संदीप नलवडे यांनी हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून रोहित याला ताब्यात घेतले.

Sangli Crime News: कुपवाडमध्ये साथीदाराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

कुपवाडमध्ये साथीदाराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याचे उघडकीस झाले आहे. एम.आय.डी.सी पोलिसांनी काही तासात खूनाचा उलगडा केला. या खुन प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. छबुताई दगडू केंगार, शाहरुख फारूक मकानदार असे अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. कुपवाडच्या कापसे प्लॉटमध्ये खूनाची घटना घडली होती. यामध्ये राहत्या घरात दगडू केंगार याचा मृतदेह आढळून आला आहे. हा खुनाचा प्रकार असल्याने कुपवाड पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. हा खुन अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आली आहे. अखेर काही तासातच मयत दगडू केंगार याची बायको छबुताई दगडू केंगार, शाहरुख फारूक मकानदार यांनी दगडू यांच्या अंगावर धारधार शस्त्राच्या जखमा करून खुन केल्याची कबुली दिली आहे.

Sangli Crime News: दारूच्या दुकानात मित्रासोबत झालेल्या वादावादीतून तरुणाचा खून

कुपवाड शहरातील बामणोली रस्त्यालगत असलेल्या एका देशी दारूच्या दुकानात दारू पित बसलेल्या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालून निघृण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली असून मयताच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आहे. सचिन अपराध माने(वय २३, रा. अवधूत कॉलनी, कुपवाड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनानंतर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलेले आहे.

सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृत सचिन अपराध माने हा तरुण बामणोली रस्त्यालगत असलेल्या एका देशी दारूच्या दुकानात दारू पित बसलेला होता. यावेळी दोन संशयित तरुण दारू दुकानात आले. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे होती. संशयित दोघांनी दारू पित बसलेल्या सचिना अपराध माने यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव घातल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. सचिन माने रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच संशयित हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले. खुनाच्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे व पोलिस पथक घटनास्थळी दाखल होऊन तत्काळ पंचनामा केला. सोमवारी बामनोलीतील देशी दारूच्या दुकानात सचिन मानेवर धारदार हत्याराने वार झाले यात तो मयत झाला. मागील काही दिवसांपूर्वी मयत सचिन याची वादावादी झाली होती. सचिन माने माने याच्या मित्रासोबत शुभम वाघमोडे याचा मित्र व शुभम वाघमोडे या दोघांच्या असणाऱ्या वादावादीत सोमवारी सचिन माने हा सहभागी झाला असता शुभम वाघमोडे व सुनील दुधाळ या दोघांनी मिळून सचिन माने याला हत्यारांनी वार करून ठार केले. या खूनप्रकरणी या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे.

आणखी वाचा – Sangli Crime : चोरीचा केवळ संशय, चिमुकल्या बहिणींचा रात्रभर उलटं टांगून छळ; 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, सांगली हादरली

आणखी वाचा

Comments are closed.