सिव्हिल इंजिनिअर ते फिल्ममेकर, कोणतीही ट्रेनिंग नसतानाही सिनेमा जगतात झाले ‘सरकार’ – Tezzbuzz
राम गोपाल वर्मा हे एक उत्तम दिग्दर्शक आहेत. तसेच या चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. आज 7 एप्रिल रोजी राम गोपाल वर्मा यांचा वाढदिवस आहे. तर आता ते त्याचा 64वा वाढदिवस साजारा करत आहेत. तर राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटसृष्टीला उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट दिले, तसेच ‘सत्या’ आणि ‘कौन’ या चित्रपटांमुळे त्यांना जास्त ओळख मिळाली. तर बॉलीवूड मधील एक उत्तम दिग्दर्शकापैकी यांना मानले जाते. तसेच त्यांच्यामुळे अनेक कलाकार प्रसिद्ध झाले. तर अनुराग कश्यप यासारख्या उत्तम दिग्दर्शकांनीही त्यांच्या हाताखाली काम केले आहे. तर त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज त्याच्या विषयी जाणुन घेवुयात.
राम (ram)गोपाल वर्मा यांचा जन्म 7 एप्रिल, 1962 रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झाला. आज, राम गोपाल वर्मा हे चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले, परंतु चित्रपटांबद्दलच्या त्यांच्या आवडीने त्यांना चित्रपटसृष्टीत आणले. त्यांनी हैदराबादमध्ये एक व्हिडिओ लायब्ररी चालवली, जिथे त्यांना प्रेक्षकांच्या आवडीनिवडी आणि चित्रपट निर्मितीतील बारकाव्यांची सखोल माहिती मिळाली. 1989 मध्ये, त्यांनी नागार्जुन, अमला आणि रघुवरन अभिनीत, विद्यार्थी राजकारणावर आधारित ‘शिवा’ या एक्शन ड्रामाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि त्यांना नंदी पुरस्कार मिळाला.
राम गोपाल वर्मा यांनी या नंतर अनेक उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन केले. राम गोपाल वर्मा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांचे लग्न रत्ना वर्मा यांच्याशी झाले होते, पण त्यांचा घटस्फोट झाला. या लग्नापासून त्यांना रेवती नावाची एक मुलगी आहे. रेवती सोशल मीडिया आणि प्रसिद्धीपासून दूर राहते.
‘खतरों के खिलाडी १५’ दोन वर्षांनंतर परत येणार; रोहित शेट्टी शूटिंग सुरु करणार शूटिंग
Comments are closed.