शरद पवार म्हणाले अपरिपक्व, आत्या सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना काँग्रेसचा आवाका समजावून सांगि

पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे थेट काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु झाल्याचा निष्कर्ष काढणारे राष्ट्रावादी काँग्रेसचे (NCP) नवनिर्वाचित राज्यसभा खासदार आणि भाचे पार्थ पवार (Parth Pawar) यांना खासदार सुप्रिया सुळे (सुप्रिया सुळे) यांनी मंगळवारी समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेस (Congress) पक्ष हा कशाप्रकारे सर्वव्यापी राहिला आहे, हे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. (Maharashtra Politics news)

आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष जवळून पाहिला आहे. मी अनेकदा काँग्रेसच्या साथीने लढले आहे, त्यांच्या मतांनी आणि आशीर्वादाने निवडून आले आहे. अजितदादा असतील,मी असेन, शरद पवार साहेब तर अनेकवर्षे काँग्रेसमध्येच होते. आम्ही सगळे काँग्रेसी विचारांच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. या देशावर इंग्रज राज्य करत होते, तेव्हा याच काँग्रेस पक्षामुळे देशाला मोकळा श्वास घेता आला, स्वातंत्र्य ही काँग्रेसची देण आहे. काँग्रेसचे योगदान खूप मोठे राहिले आहे. या देशाचे पंतप्रधान ते सरपंच, महिला आरक्षण, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी आणलेले आर्थिक धोरण, या सगळ्याबाबात काँग्रेसचे योगदान नाकारुन चालणार नाही. मात्र, लोकशाहीत सगळ्यांना बोलण्याचा अधिकार असतो. त्यामुळे ते (पार्थ पवार) बोलत असतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

तसेच या मुद्द्यावर मला प्रश्न न विचारात ते अजित पवार गटाला विचारला पाहिजेत. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु होईल, हे त्यांच्या खासदारांचे वक्तव्य आहे. त्यामुळे याबाबत त्यांना विचारावे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Sharad Pawar on Parth Pawar: शरद पवारांनी पार्थ पवारांचे कान टोचले, सुप्रिया सुळे म्हणाल्या….

पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षाबाबत केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी पार्थ पवार यांचे कान टोचले होते. ‘मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर स्टेटमेंट करायला एकप्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे, हे आज मी सांगू शकत नाही’, असे शरद पवार यांनी म्हटले होते. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की,

आदरणीय पवार साहेब कर्तृत्व, वयाने आणि नात्याने सर्वच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहेत. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांनी बोलल्यावर आपण काहीच बोलायचं नसतं हे माझे संस्कार आहेत. त्यामुळे मी यावर बोलणार नाही. पार्थला सल्ला देण्याचा प्रश्न असेल तर कौटुंबिक सल्ला चॅनेलवर नव्हे तर घरात दिला जातो, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

आणखी वाचा

‘काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल…’ पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता…

आणखी वाचा

Comments are closed.