अजितदादांचा अपघात की घातपात? भोंदू अशोक खरातच्या अघोरी पूजेचं कनेक्शन; जानेवारीतील CDR ठरणार कळ

अमोल मिटकरी आणि अशोक खरात: अजित पवार (Ajit Pawr) यांच्या विमान अपघातातील निधनानंतर त्यांच्या मृत्यूबाबत विविध प्रकारचे दावे पुढे येत आहेत. त्यातच भोंदू अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर या अपघाताशी त्याचा संबंध जोडला जाऊ लागला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी अशोक खरातच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले, असा दावा केलाय. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी देखील याबाबत एक खळबळजनक दावा केलाय.

Amol Mitkari: नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “अजितदादा विमान अपघात प्रकरण संदर्भात नराधम अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा संबंध असल्याची सर्वांना शंका होतीच. जानेवारी महिन्यात सर्वात जास्त SMS चौकशीच्या फेऱ्यात आले. या महिन्यातील खरातचे CDR काढल्यास दादांचा अपघात की घातपात? हे स्पष्ट होईल,” असे त्यांनी म्हटले आहे.

Anjali Damania: अंजली दमानिया केलेत गंभीर आरोप

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भोंदू अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांचा कच्चाचिठ्ठाच मांडला. अजित पवारांचा अपघात ज्या दिवशी झाला, त्या कालावधीत खरातच्या समता पतसंस्थेमधील खात्यावर संशयास्पद हालचाली झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. 27 जानेवारी (अपघाताच्या एक दिवस आधी): खरातच्या खात्यावरून व्यवहाराचे 17 मेसेज आले. 28 जानेवारी (अपघाताचा दिवस): 19 मेसेज आले. 29 ते 31 जानेवारीला अनुक्रमे 10 आणि 8 मेसेज आले. अजित पवारांच्या निधनाशी संबंधित या महत्त्वाच्या दिवसांमध्ये खरातच्या खात्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार का झाले? याची एसआयटी (SIT) चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat: अशोक खरातचा सीडीआर कुठून आला?; अंजली दमानियांनी ऑन कॅमेरा दाखवलं, ऑडिओ क्लिपही ऐकवली, नंतर भर पत्रकार परिषदेत रडल्या!

आणखी वाचा

Comments are closed.