पिता-पुत्रांना कोठडीत निर्दयीपणे मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू, 6 वर्षांनंतर क्रूर कृत्याची 9 प

मदुराई: तामिळनाडूतील सथानकुलम येथे लॉकडाऊन काळात घडलेल्या पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांच्या अमानुष पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाचा निकाल लागला असून, मदुराई जिल्हा न्यायालयाने नऊ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी ६ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या या निकालाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. न्यायालयाने या प्रकरणाला ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rare of the rarest) श्रेणीत ठेवत, खाकी वर्दीचा गैरवापर करून करण्यात आलेल्या क्रूरतेवर ओढलेले ताशेरे पोलीस दलासाठी मोठा धडा असल्याचं बोललं जात आहे.(tamilnadu crime news)

tamilnadu crime news : नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण १९ जून २०२० रोजी सुरू झाले होते. मोबाईलचे दुकान चालवणारे जयराज आणि बेनिक्स यांना केवळ लॉकडाऊनचे नियम मोडून दुकान जास्त वेळ उघडे ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून सथानकुलम पोलिसांनी अटक केली होती. मात्र, पोलीस कोठडीत नेल्यानंतर या पिता-पुत्रावर पोलिसांनी अमानुष अत्याचार केले. त्यांना विवस्त्र करून रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या शरीराच्या नाजूक भागांना गंभीर इजा पोहोचवण्यात आली होती. अटकेनंतर काही दिवसांतच या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जात होता.(tamilnadu crime news)

tamilnadu crime news : दोषींमध्ये कोणाचा समावेश?

या प्रकरणाचा तपास सीबीआयने (CBI) आपल्या हाती घेतला होता. तपासादरम्यान पोलीस ठाण्यातील भिंतींवर आणि शौचालयात सापडलेले रक्ताचे नमुने मृतांच्या डीएनएशी जुळले, जे पोलिसांच्या क्रूरतेचा सर्वात मोठा पुरावा ठरले. मदुराई जिल्हा न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले की, जर या प्रकरणावर उच्च न्यायालयाची सतत देखरेख नसती, तर पोलिसांच्या या अमानवीय कृत्याचे सत्य कधीच बाहेर आले नसते. दोषींमध्ये इन्स्पेक्टर श्रीधर, सब-इन्स्पेक्टर बालकृष्णन, रघु गणेश आणि इतर सहा हवालदारांचा समावेश आहे. न्यायालयाने मुख्य दोषी इन्स्पेक्टर श्रीधरला फाशीच्या शिक्षेसोबतच १५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.(tamilnadu crime news)

न्यायाधीश जी. मुथुकुमारन यांनी आपला निकाल देताना म्हटले की, हे कृत्य केवळ रागाच्या भरात केलेले नसून ते पूर्व नियोजित आणि सूडबुद्धीने केलेले अत्याचार होते. पोलिसांनी आपल्या अधिकारांचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांचा जीव घेतल्याने ही शिक्षा देणे आवश्यक आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला सहा वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर न्याय मिळाला असून, यामुळे पोलीस प्रशासनात सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर जरब बसली आहे.

या प्रकरणातील सर्व 10 आरोपींना निलंबित करण्यात आले आणि त्यांना अटक करुन मदुराईतील सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले. या आरोपींपैकी एक जण पालदुरई याचा मृत्यू ऑगस्ट 2020 मध्ये कोव्हिडमुळे झाला. इतर 9 आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन भागात 2427 पानांचे चार्जशीट दाखल केले. 23 मार्चला न्यायालयाने सभी आरोपींनी दोषी ठरवले आणि 6 एप्रिल रोजी शिक्षा सुनावली.

tamilnadu crime news : कुणाला किती शिक्षा आणि किती दंड

या प्रकरणातील मुख्य दोषी श्रीधरसह सर्व 9 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच वेळी वेगवेगळ्या कलमांतर्गत सात वर्षांची शिक्षा आणि एकूण 76.38 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

न्यायालयाने इंस्पेक्टर श्रीधरला 24.10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दुसरा दोषी बालकृष्णन याला विविध कलमांतर्गत 1 वर्ष ते सात वर्ष कारावासाची शिक्षा, दुहेरी मृत्यूदंड आणि 16.80 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

तिसरा दोषी रघुगणेशला विविध कलमांतर्गत एक वर्ष ते सात वर्षांचा कारावास, दुहेरी मृत्यूदंड आणि 5.20 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

चौथा दोषी हेड काँस्टेबल मुरुगन याला दुहेरी मृत्यूदंडासहित विविध कलमांतर्गत एक ते सात वर्षांचा कारावास, तसेच 10.10 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाचवा दोषी सामदुरई याला दुहेरी मृत्यूदंड, एक ते सात वर्षापर्यंतचा कारावास 5.60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सहावा दोषी मुथुराजाला दुहेरी मृत्यूदंड, एक ते सात वर्षापर्यंतचा कारावास, 3.20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सातवा दोषी सेल्लादुरईला दुहेरी मृत्यूदंड, एक ते सात वर्षांचा कारावास आणि 14.40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आठवा दोषी थॉमस फ्रान्सिसला दुहेरी मृत्यूदंड, एक ते सात वर्षांचा कारावास, 10.54 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नववा दोषी वेलुमुथुला दुहेरी मृत्युदंड, एक ते सात वर्षांचा कारावास आणि 10.54 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.