पाकिस्तान सुपर लीगमध्ये हादरून टाकणारी घटना; चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडू बेशुद्ध, तातडीने र
पाकिस्तान मीर हमजा सज्जाद हॉस्पिटल PSL 2026 : पाकिस्तान सुपर लीगदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मीर हमजा सज्जाद (Hamza Sajjad Cricket Player Pakistan) प्रॅक्टिस सेशनदरम्यान गंभीर जखमी झाला. इस्लामाबाद युनायटेड संघासाठी खेळणारा हा खेळाडू सराव करत असताना फलंदाज मार्क चॅपमन याने मारलेला जोरदार शॉट थेट हमजाच्या डोक्यावर जाऊन आदळला.
चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडू बेशुद्ध
चेंडू लागल्यानंतर हमजा तात्काळ बेशुद्ध पडला. हा प्रकार घडताच नेट सेशनमध्ये एकच खळबळ उडाली आणि सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने, सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. (Mir Hamza Sajjad hospital after being struck on head during PSL practice)
सीटी स्कॅन करण्यात येणार…
मीडिया रिपोर्टनुसार हमजा आता शुद्धीवर आला आहे. कोणतीही गंभीर दुखापत झाली आहे का, याची खात्री करण्यासाठी त्याचा सीटी स्कॅन करण्यात येणार आहे. मात्र, त्याच्या दुखापतीबाबत संघाकडून अद्याप अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही.
कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, या हंगामात हमजाला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने आतापर्यंत 6 टी-20 सामन्यांत 8 बळी घेतले आहेत, तर 8 प्रथम श्रेणी सामन्यांत 25 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाला पीएसएल लिलावात इस्लामाबाद युनायटेडने 70 लाख पाकिस्तानी रुपयांना खरेदी केले होते.
पाकिस्तान सुपर लीगला आणखी एक धक्का
दरम्यान, पाकिस्तान सुपर लीगला आणखी एक धक्का बसला आहे. कराची किंग्स संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला ऑस्ट्रेलियामध्ये मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आला असला, तरी पुढील महिन्यात त्याला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे तो पुन्हा पीएसएलमध्ये खेळण्यासाठी परतणार का, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
🚨 मीर हमजा सज्जादला डोक्याला दुखापत झाल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले
इस्लामाबाद युनायटेडचा मीर हमजा सज्जादला प्रशिक्षणादरम्यान डोक्याला मार लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. pic.twitter.com/mXqhXOAlfF
– शाहनवाज राजपार (@iamSkrajpar) 7 एप्रिल 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.