पोलीस पवन खेरा यांच्या घरी पोहोचले.

मुख्यमंत्री हेमंत शर्मांच्या पत्नीकडून एफआयआर नोंद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, गुवाहाटी

आसाम पोलिसांचे पथक काँग्रेस नेते पवन खेडा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या पत्नीकडून एफआयआर नोंदविण्यात आल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पवन खेडा हे पोलिसांच्या कारवाईवेळी निवासस्थानी नव्हते. आसाम पोलीस त्यांच्या चौकशीसाठी प्रतीक्षा करत होते, दिल्ली पोलिसांचे जवानही यावेळी उपस्थित होते.

ज्या लोकांनी आरोप केले होते, ते आता पळ काढत आहेत. अखिल गोगोई देखील पसार होतील. खेडा आणि गोगोई यांनी दाखविलेले दस्तऐवज बनावट असल्याचे तीन राज्यांच्या सरकारांनी स्पष्ट केले आहे. हे दस्तऐवज बहुधा राहुल गांधी यांनीच पवन खेडा यांना दिले असावीत अशी टिप्पणी मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केली आहे.

हेमंत शर्मा यांच्या पत्नी रिनिकी भुइयां शर्मा यांच्याकडे इजिप्त, एंटीग्वा-बर्बुडा आणि युएईचा पासपोर्ट असल्याचा आरोप पवन खेडा यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. हेमंत शर्मा आणि त्यांच्या पत्नीने हा आरोप सपशेल खोटा असल्याचे सांगितले होते.

पवन खेडा हे सोमवारीच गुवाहाटीतून पसार झाले. पोलीस दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी गेले होते, परंतु ते हैदराबाद येथे पळाल्याचे माध्यमांद्वारे मला कळल्याचे मुख्यमंत्री शर्मा यांनी म्हटले आहे.

Comments are closed.