अंदमानजवळ म्यानमारच्या 11 नागरिकांना अटक

अंदमान

अंदमान आणि निकोबार बेटसमुहाच्या एका दुर्गम स्थानावरून म्यानमारच्या 11 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. सी सेंटिनल अभियानादरम्यान निकोबार जिल्ह्याच्या नानकोवरी बेटावरून म्यानमारच्या नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांना उत्तर काकाना बेटानजीक म्यानमारची एक संशयास्पद नौका पोहोचल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अभियान राबत या नौकेवरील म्यानमारच्या नागरिकांना अटक केली आहे.

Comments are closed.