Twin Tunnel Project : दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा शुभारंभ





ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर पर्याय ठरणाऱ्या ठाणे – बोरिवली दुहेरी बोगद्याच्या बोअर मशीनच्या माध्यमातून खोदकामाचा शुभारंभ मंगळवारी (7 एप्रिल) करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. एमएमआरडीच्या (MMRDA) माध्यमातून 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असून भविष्यात दैनंदिन 1 लाख वाहने या बोगद्यातून प्रवास करतील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.



Comments are closed.