11 दिवसात पैसे डबल होणार; ज्येष्ठ नागरिकाने गुंतवले 12 कोटी आणि पुढे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

12 कोटीचे 11 दिवसात मिळणार 24 कोटी होणार असे सांगत पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. पैसे डबल मिळण्याच्या हव्यासापोटी हडपसर भागातील एका 75 वर्षीय डॉक्टरने सायबर चोरट्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी १२ कोटी ३१ लाख रुपये दिले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील भोसलेनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी जानेवारी महिन्यात ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक योजनांची माहिती देऊन त्यांना जाळ्यात ओढले. शेअर बाजराात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी त्यांच्याकडून मार्च महिन्यात वेळोवेळी १२ कोटी ३१ लाख रुपये घेतले. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी पैसे जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचे भासविले. मात्र, प्रत्यक्षात चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चोरट्यंनी ज्या खात्यात पैसे जमा करुन घेतले. त्या बँक खात्याची तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून संबंधित बँकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांचे फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारे संदेश आल्यास प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Comments are closed.