ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 एप्रिल 2026 | गुरुवार

1. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, म्हणाले, शरद पवारांची सूचना, राष्ट्रवादीतील अनेकांची विनंती, फडणवीसांचाही फोन आला https://tinyurl.com/muux6xpy राजकारणातील अचंबित करणारी घटना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना फोन; बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेण्याची विनंती https://tinyurl.com/4j9r6n5p  काँग्रेसला मी सांगू शकत नाही, पण एक सल्ला देईन की, ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल; शरद पवारांचा सल्ला काँग्रेकडून मान्य https://tinyurl.com/2zuxt9yu 

2. बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात https://tinyurl.com/3hn84a3r राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम https://tinyurl.com/5n6b6wz9 
 
3. माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप, म्हणाल्या, आता मी घरोघरी जाऊन प्रचार करणार https://tinyurl.com/4appmzsj  सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर https://tinyurl.com/bdefst6a  

४. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गहिनीनाथ गडावर सुरेश धसा यांचा उल्लेख; भक्तांकडून आवाज आला, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करा
https://tinyurl.com/bdfx7dvn  बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारल्या; गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमानंतर सुरेश धस म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही https://tinyurl.com/2vp47p37 

5. नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन अत्याचार; धर्मांतराचाही आरोप, 9 गुन्हे दाखल, 5 आरोपींना अटक https://tinyurl.com/yw7hsruh नाशिकच्या आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/2f5jkz7b 

6. भरधाव कारवरचं नियत्रंण सुटलं; कार पलटी होऊन केजचे तहसीलदार राकेश गिड्डेंचा जागीच मृत्यू; अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्ह्यात हळहळ
https://tinyurl.com/yc3az74s 

7. अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी; न्यायालयात सरकारी आणि आरोपीच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, अशोक खरातने हात जोडले
https://tinyurl.com/4asj7v3e  तुला मुलगाच होईल…गर्भवती महिलेला नको नको ते सांगून अशोक खरातकडून लैंगिक शोषण; आता गावकऱ्यांनीही सांगितली हादरवणारी माहिती https://tinyurl.com/5ccu4dne 

8. पुण्यात महिला प्राचार्याकडून 7 लाखांची खंडणी उकळली; ‘रील स्टार’ महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल, पोलीस दलात खळबळ!
https://tinyurl.com/mvas4mx5 संभाजीनगरमधील धक्कादायक घटना, भाजीत केस निघाला, पतीनं जनावरासारखं मारलं, रात्रभर वेदना सहन केल्या; पुन्हा सकाळी त्रास देताच विवाहितेनं छळाला कंटाळून जीवन संपवलं https://tinyurl.com/3nesx8tf 

9. युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, बेंजामिन नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार https://tinyurl.com/yn3bex9k अमेरिका-इराण युद्धबंदी, पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ यांचा आनंद गगनात मावेनासा झाला, 'असिम मुनीर आमचा हिरो, जगाच्या नकाशावर आमचा दर्जा उंचावला https://tinyurl.com/5swfuzj5 

10. अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; स्लो ओव्हर रेटमुळे कॅप्टन शुभमन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला https://tinyurl.com/35367t58 विराट कोहली प्रमाणं मॅच कधी फिनिश करणार? पत्रकाराचा थेट प्रश्न, बाबर आझम भडकला, व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/4573247j 

*एबीपी माझा स्पेशल*

युद्ध थांबताच दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; चांदीचा भावही झाला कमी, तुमच्या शहरातील आजचे दर किती? जाणून घ्या
https://tinyurl.com/5ddj9dct 

गुलाबी जॅकेट, डोळ्यावर चष्मा, पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ; दिल्लीत अजितदादांसारखा लूक, गल्लीत चर्चा
https://tinyurl.com/zauddfhy 

*एबीपी माझे Whatsapp चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

Comments are closed.