Ratnagiri News – जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे नवे दालन! सोमवार ते गुरूवार पदाधिकारी सोडवणार जनतेची गाऱ्हाणी
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जबरदस्त मोहीम हाती घेतली आहे.नागरिकांच्या प्रश्नांवर आता शिवसेना आवाज उठवणार आहे. रत्नागिरीतील नाचणे रोड येथील शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आठवड्यातील चार दिवस शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी जनतेला भेटून त्यांची गाऱ्हाणी ऐकणार आहेत.सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना त्यांचा आवाज बुलंद करणार आहे.
जनतेचे प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी हि नवी मोहीम दि.१३ एप्रिल पासून सुरु होणार आहे. त्यामध्ये दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम,रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ महिला संपर्क संघटक आणि जिल्हा परिषद सदस्या नेहा माने,जिल्हा संघटक आणि जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे आणि युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत हे जनतेची गाऱ्हाणी ऐकून ती सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्यांने एक वार निश्चित केला आहे.सोमवार ते गुरूवार असे दुपारी १२ ते दुपारी २ यावेळेत शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.या ठिकाणी नागरिकांना आपल्या समस्या आणि प्रश्न मांडता येणार आहे.
- सोमवार- नेहा माने – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ महिला संपर्क संघटक आणि जिल्हा परिषद सदस्या वेळ- दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत
- मंगळवार- दत्ता कदम – दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख
वेळ-दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत - बुधवार- संतोष थेराडे – जिल्हा संघटक आणि जिल्हा परिषद सदस्य
वेळ- दुपारी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत - गुरुवार- प्रसाद सावंत- जिल्हा युवाधिकारी युवासेना रत्नागिरी
वेळ- सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत
Comments are closed.