ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘लोकमत टाइम्स’च्या वृत्तानुसार, आशा भोसले यांच्यावर सध्या रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात (EMS) उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे वृत्तात सांगण्यात आले आहे.

आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत सध्या अधिक तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही. तसेच, त्यांच्या कुटुंबाकडून किंवा रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेले नाही.

Comments are closed.