चेन्नईचं COMEBACK… सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला न

CSK ने DC चा 20 धावांनी पराभव केला IPL 2026 : चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 मधील 18 व्या सामन्यात यजमान चेन्नई सुपर किंग्सने (CSK) अखेर विजयाचा दुष्काळ संपवला. सलग तीन पराभवांच्या धक्क्यातून सावरत, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सचा 23 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन, ज्याने आपल्या बॅटने दिल्लीच्या गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवला.

चेन्नई सुपर किंग्स संघाला आरसीबी, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सकडून मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले होते. दिल्लीने आपला सलग दुसरा सामना गमावला. सीएसकेने 20 षटकांत दोन गडी गमावून 212 धावा केल्या. पण दिल्ली कॅपिटल्स निर्धारित षटकांत केवळ 189 धावाच करू शकली. यामध्ये केवळ ट्रिस्टन स्टब्सने 60 धावांची खेळी केली. या विजयासह, चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत 10 व्या स्थानावरून 9 व्या स्थानावर झेप घेत दोन गुणांचे खाते उघडले आहे.

सॅमसनची वादळी शतकी खेळी

सॅमसनने कर्णधार ऋतुराज गायकवाडसोबत डावाची सुरुवात केली. पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळ करत त्याने केवळ 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याची धडाकेबाज फलंदाजी सुरूच राहिली आणि 52 चेंडूत 14 चौकार व 3 षटकारांसह त्याने शतक झळकावले. हे शतक सॅमसनच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वेगवान ठरले. तो आयपीएल 2026 मध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाजही बनला आहे. एकूणच हे त्याच्या आयपीएलमधील चौथे शतक आहे. या सामन्यात त्याने 56 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांसह 115 धावा करत 205.35 चा जबरदस्त स्ट्राइक रेट नोंदवला.

इतर फलंदाजांची साथ

कर्णधार गायकवाड याला मोठी खेळी करता आली नाही, तो 18 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. तर आयुष म्हात्रे याने 36 चेंडूत 59 धावा करत महत्त्वाची साथ दिली (रिटायर्ड आउट). शेवटच्या षटकांत शिवम दुबे याने 10 चेंडूत 20 धावा चोपत संघाचा स्कोर 200 पार नेला. दिल्ली कॅपिटल्सकडून एकमेव विकेट कर्णधार Axar Patel याने घेतली. मात्र इतर गोलंदाजांना चेन्नईच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आले.

चांगली सुरूवात, पण मधल्या फळीत अपयशी…

213 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरूवात केली. सलामीवीर पाथुम निसांकाने 24 चेंडूत 41 धावांची आक्रमक खेळी केली, तर के.एल. राहुलने 10 चेंडूत 18 धावा केल्या. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. अक्षर पटेल (1) आणि समीर रिझवी (6) स्वस्तात बाद झाल्याने दिल्लीच्या अडचणी वाढल्या. आशुतोष शर्माने 10 चेंडूत 19 धावांची फटकेबाजी करून आशा पल्लवित केल्या होत्या, पण तोदेखील मोक्याच्या क्षणी बाद झाला. दिल्ली कॅपिटल्सचा चार सामन्यांमधील हा दुसरा पराभव आहे. या विजयासह, चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत 10 व्या स्थानावरून 9 व्या स्थानावर झेप घेत दोन गुणांचे खाते उघडले आहे.

हे ही वाचा –

CSK vs DC IPL 2026 : सरफराज खानचा चित्तथरारक झेल, अक्षर पटेलसोबत सगळेच अवाक्, सेलिब्रेशनने चेपॉकला वेड लावलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.