बांगलादेश क्रिकेटमधील सत्तापालटामुळे मोहम्मद नबीचा आनंद गगनात! 3 ओळींच्या मेसेजमधून व्यक्त केल्या भावना

बांगलादेशात जसा सरकारचा तख्तापलट झाला होता, तसाच देशाच्या क्रिकेट बोर्डातही मोठा सत्तापालट पाहायला मिळाला आहे. देशाच्या क्रिकेट बोर्डात झालेल्या या बदलामुळे अफगाणिस्तानचा दिग्गज अष्टपैलू मोहम्मद नबी (Mohmmed Nabi) खूप आनंदी दिसला.

त्याने सोशल मीडियावर आपली आनंद व्यक्त करत एक पोस्ट लिहिली. तो म्हणाला की, बांगलादेशचा माजी दिग्गज खेळाडू तमीम इक्बालला (Tameem Iqbal) देशाच्या क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष बनवण्यात आले आहे. तमीमने अमीनुल इस्लाम यांची जागा घेतली आहे. यावर नबीने तमीमचे अभिनंदन केले. नबीने 3 ओळींचा एक छोटासा संदेश लिहिला. त्याचा संदेश दिसायला जरी छोटा असला, तरी त्याचा प्रभाव खूप मोठा होता.

मोहम्मद नबीने एक्स (X) वर तमीम इक्बालचे अभिनंदन करताना लिहिले की, तमीम इक्बाल, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष बनल्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुमच्या कारकिर्दीत तुम्ही मैदानावर खूप चमकलात आणि मला शंका नाही की तुम्ही तुमच्या या नवीन भूमिकेतही तेच समर्पण, नेतृत्व आणि उत्कृष्टता घेऊन याल. तुम्हाला या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

नबी आणि तमीम इक्बाल यांनी एकमेकांविरुद्ध भरपूर क्रिकेट खेळले आहे. अशा परिस्थितीत, एक सहकारी म्हणून नबीने तमीमला शुभेच्छा दिल्या. आता तमीमच्या नेतृत्वाखाली बांगलादेश काय काय बदल करतो आणि आपल्या देशाच्या क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणते नवीन निर्णय घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

तमीम इक्बालने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 70 कसोटी, 243 वनडे आणि 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच, कसोटी 134 डावांत 38.89 च्या सरासरीने 5,134 धावा केल्या. यात 10 शतकांचा समावेश आहे. याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये 240 डावांत 36.65 च्या सरासरीने 8,357 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 14 शतके ठोकली आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये 78 डावांत 116.96 च्या स्ट्राईक रेटने 1,758 धावा केल्या. टी-20 मध्ये त्याने 1 शतक झळकावले आहे.

Comments are closed.