PBKS vs SRH: विश्वास बसणार नाही! मार्को यान्सनने हवेत उडी घेत पकडला भन्नाट कॅच VIDEO VIRAL
आय़पीएल 2026 मधील सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात न्यू चंदीगडच्या मुल्लांपुर क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात हैदराबादने दमदार फलंदाजी करत 20 षटकांत 219 धावांचा मोठा स्कोर उभा केला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, मात्र हैदराबादच्या फलंदाजांनी त्याचा पूर्णपणे फज्जा उडवला.
या सामन्यात पंजाबचा वेगवान अष्टपैलू मार्को यान्सनने आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले. हैदराबादचा कर्णधार ईशान किशनचा त्याने सीमारेषेजवळ घेतलेला एकहाती झेल हा सामन्याचा आकर्षणबिंदू ठरला. डावाच्या 14व्या षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर ईशान किशनने काऊ कॉर्नरच्या दिशेने मोठा फटका मारला होता. चेंडू षटकारासाठी जात असताना यान्सनने धावत येत अचूक वेळ साधत एकहाती झेल पकडला. हा झेल पाहून सर्वच खेळाडू आणि प्रेक्षक थक्क झाले.
ईशान किशनने या सामन्यात 17 चेंडूत 27 धावांची खेळी केली, ज्यात तीन चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र यान्सनच्या झेलमुळे त्याची खेळी लवकर संपली.
दुसरीकडे, हैदराबादच्या डावात अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली. त्याने ट्रॅव्हिस हेडसोबत मिळून संघाला तुफानी सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या सहा षटकांतच संघाचा स्कोर 100 च्या पुढे नेला. अभिषेकने अवघ्या 28 चेंडूत 74 धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यामध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.
या शानदार फलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्ससमोर मोठे लक्ष्य ठेवले असून आता पंजाबचा संघ या धावांचा पाठलाग कसा करतो, ते पाहूया.
Comments are closed.