अभिषेक शर्माचा कहर! 18 चेंडूत अर्धशतक ठोकत पंजाबला अक्षरक्ष: धुतले, एसआरचने केला भन्नाट विक्रम
आयपीएल 2026 च्या 17व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादने वादळी सुरुवात करत पंजाब किंग्जसमोर एक जबरदस्त आव्हान उभे केले आहे. न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात, पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हैदराबादच्या सलामीच्या फलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे सिद्ध केले.
अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पंजाबच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. विशेषतः अभिषेक शर्माने अवघ्या 18 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या स्फोटक खेळीने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. हेडनेही त्याला उत्तम साथ दिली. त्यानेही अत्यंत वेगाने धावा केल्या.
या जोडीच्या जोरावर, सनरायझर्स हैदराबादने पॉवरप्लेमध्येच 105 धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएलच्या इतिहासात, पॉवरप्लेमध्ये 100हून अधिक धावा करण्याचा विक्रम हैदराबादने नोंदवण्याची ही तिसरी वेळ आहे. विशेष म्हणजे, इतर कोणत्याही संघाने ही कामगिरी एकापेक्षा जास्त वेळा केलेली नाही; ज्यामुळे हैदराबादची ही कामगिरी अधिकच असाधारण ठरते.
पॉवरप्लेमध्ये सनरायझर्स हैद्राबादचाच बोलबाला!!!
(आयपीएलमध्ये 1 ते 6 षटकांत 100+ धावा)
125/0 – SRH v DC, दिल्ली, 2024
107/0 – एसआरएच विरुद्ध एलएसजी, हैद्राबाद, 2024
105/0 – एसआरएच विरुद्ध पीबीकेएस, मुल्लानपूर, 2026*
105/0 – केकेआर विरुद्ध आरसीबी, बंगळुरू, 2017
100/2 – CSK विरुद्ध PBKS, मुंबई, 2014
पंजाबच्या गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने एकाच षटकात तब्बल 24 धावा दिल्या. त्या षटकात ज्यामध्ये चार ‘वाईड’ चेंडूंचा समावेश होता. अभिषेकने त्याला अक्षरशः धुतले. ज्यामध्ये त्याने दोन चौकार व दोन षटकार खेचल्या. याआधीच्या षटकातही तो महागडा ठरल्यामुळे, कर्णधाराने त्यानंतर त्याला गोलंदाजीवरून काढून घेतले.
अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या गड्यासाठी 120 धावांची भागीदारी रचली. हेडने 23 चेंडूंमध्ये 38 धावा केल्या, तर अभिषेकने अवघ्या 28 चेंडूंमध्ये 74 धावांची वादळी खेळी साकारली. या दोन्ही फलंदाजांना अखेर शशांक सिंगने बाद केले.
या दोघांच्या खेळीवर सनरायझर्स हैदराबादने आपल्या मर्यादित 20 षटकात 6 विकेट गमावून 219 धावा केल्या आहेत. पंजाबने शेवटच्या टप्यात कमबॅक करत हैदराबादला मोठी धावसंख्या रचण्यापासून रोखले. आता पंजाबसमोर 220 धावांचे टार्गेट आहे.
Comments are closed.