कलाकारांना धमकावण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहास वाचा, कामराचे सरनाईकांना चोख उत्तर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हक्कभंगाच्या कारवाईवरून धमकावणाऱया शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांना ‘स्टॅण्ड अप कॉमेडियन’ पुणाल कामराने चोख उत्तर दिले आहे. कलाकारांना धमकावण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहास वाचा, असा मिश्किल सल्ला देणारी पोस्ट सोशल मीडियावर कामराने लिहिली आहे. बाळासाहेब यांनी रेखाटलेले एक व्यंगचित्रही त्याने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टला जोडले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक राजकीय व्यंगचित्रकार म्हणून तत्कालीन पंतप्रधानांसह अनेक सत्ताधारी व्यक्तींवर उपरोधिक टीका केली आणि त्यांची थट्टा उडवली. मात्र यासाठी त्यांना कधीही विशेषाधिकार भंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागले नाही. राजकीय उपहास हा त्या राजकीय विचारसरणीचा पाया राहिला आहे, ज्याचा खरा वारसदार असल्याचा दावा शिंदे करतात, असा टोला कामराने पोस्टमध्ये लगावला.

बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय वारशाचे रक्षण करण्यामध्ये व्यंगचित्रकार आणि उपहासकारांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचाही समावेश असेल अशी कोणीही कल्पना करेल, याची आठवणही कामराने सरनाईक यांना करून दिली.

Comments are closed.