पुण्याहून विशेष रेल्वे : पुण्याहून उत्तर महाराष्ट्रासाठी 'ही' विशेष गाडी धावणार; वेळापत्रक पहा

पुण्याहून विशेष गाड्या | उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवाशांना आरामात प्रवास करता यावा आणि त्यांना गर्दीचा सामना करावा लागू नये यासाठी मध्य रेल्वे पुणे ते गाजीपूर दरम्यान विशेष ट्रेन चालवणार आहे. ही गाडी उत्तर महाराष्ट्रातून जाणार असून, त्यामुळे अहिल्यानगर, जळगाव, मनमाड आदी शहरात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, गाझीपूर शहरातून परतणारी गाडी क्रमांक ०१४३२ आता पुणे स्थानकाऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावर थांबेल. गाडी क्रमांक ०१४३१ 'पुणे-गाझीपूर सिटी स्पेशल ट्रेन' पुण्याहून 1 मे ते 14 जुलै 2026 या कालावधीत दर शुक्रवारी आणि मंगळवारी सकाळी 06:40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 19:05 वाजता गाझीपूर शहरात पोहोचेल. या ट्रेनच्या एकूण 22 फेऱ्या असतील. पुण्याहून विशेष गाड्या

तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४३२ 'गाझीपूर सिटी-हडपसर स्पेशल' गाझीपूर शहरातून 3 मे ते 16 जुलै 2026 या कालावधीत दर रविवारी आणि गुरुवारी पहाटे 04:20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 16:20 वाजता हडपसरला पोहोचेल. या ट्रेनच्या एकूण २२ फेऱ्या असतील.

प्रवासादरम्यान ही विशेष गाडी दौंड चोर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चिवकी, विंध्याचल, वाराणसी, जौनपुर रेल्वे स्थानकावर थांबेल. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील मनमाड, जळगाव, भुसावळ रेल्वे स्थानकांचा समावेश असल्याने पुण्याहून उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष गाडी फायदेशीर ठरणार आहे. पुण्याहून विशेष गाड्या

दरम्यान, या प्रत्येक ट्रेनमध्ये 18 ICF कोच असतील, ज्यात एक वातानुकूलित (AC) 2-टायर कोच, पाच AC 3-टायर कोच, सहा स्लीपर क्लास कोच, चार सामान्य सेकंड क्लास डबे आणि दोन गार्ड-कम-लगेज व्हॅन असतील.

ट्रेन क्रमांक 01431 साठी बुकिंग 15 एप्रिल 2026 पासून सर्व संगणकीकृत प्रवासी आरक्षण केंद्रे (PRS) आणि 'IRCTC Rail Connect' प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि गार्ड/लगेज व्हॅन 'अनारिक्षित' डबे म्हणून चालवल्या जातील. या डब्यांची तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे आरक्षित करता येतील. यासाठी सुपरफास्ट, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना लागू होणारे नेहमीचे भाडे आकारले जाईल. प्रवास सुरू करण्यापूर्वी, प्रवासी NTES ॲपद्वारे किंवा रेल्वेच्या अधिकृत चौकशी पोर्टलवर मध्यवर्ती थांब्यांवर तपशीलवार वेळापत्रक तपासू शकतात.

Comments are closed.