युद्धामुळे अॅमेझॉन विक्रेत्याकडून 3.5 फ्यूल सरचार्ज वसूल करणार
इराण युद्धामुळे इंधनच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. यामुळे अॅमेझॉनने आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या थर्ड पार्टी विक्रेत्याकडून 3.5 टक्के फ्यूल आणि लॉजिस्टिक सरचार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा चार्ज 17 एप्रिलपासून लागू केला जाणार आहे. इंधन आणि ट्रान्सपोर्टेशनमुळे इंडस्ट्रीमध्ये ऑपरेशनल खर्च वाढला आहे. आतापर्यंत आम्ही हा खर्च उचलत होतो, परंतु दुसऱ्या कंपन्याप्रमाणे कॉस्ट वाढल्यामुळे आम्हीही चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे अॅमेझॉनने म्हटले आहे.
आम्ही लावलेला सरचार्ज हा अन्य कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे, असे अॅमेझॉनने म्हटले आहे. हा नियम अमेरिका आणि कॅनडामधील विव्रेत्यांवर लागू केला जाईल. जे लोक अमेझॉनच्या फुलफिलमेंट बाय अॅमेझॉन सर्विसचा वापर करतील, ते बाय विद प्राइम आणि मल्टी चॅनेल फुलफिलमेंटचा वापर करतील. त्यांना विव्रेत्यांकडून अतिरिक्त चार्ज 2 मेपासून लागू होतील. इराण युद्ध जास्त दिवस चालल्यामुळे इंधन दर वाढवण्याचा निर्णय घेतला, असे अॅमेझॉन कंपनीने म्हटले आहे. अॅमेझॉन आधी युनायटेड पार्सल सर्विस आणि फेडेक्ससारख्या कंपन्यांनी आपले फ्यूल सरचार्ज वाढवले आहे.
Comments are closed.