IPL मध्ये मोबाईल वाद पेटला! मॅनेजरची घोडचूक, वैभव सूर्यवंशीवर पण होणार कारवाई? काय सांगतो BCCI
आरआर मॅनेजर भिंड डगआउटमध्ये फोन वापरत आहे: आयपीएल (IPL) 2026 सध्या जोरात सुरू आहे आणि या हंगामात वैभव सूर्यवंशी आपल्या दमदार फलंदाजीमुळे चर्चेत आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला सलग 4 विजय मिळवून दिले आहेत. 8 गुणांसह राजस्थान सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. मात्र, या यशाच्या पार्श्वभूमीवर आता संघासोबत एक वाद जोडला गेला आहे.
राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंडर डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या फोटोमध्ये त्यांच्या शेजारी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी बसलेला दिसतो आणि तोही फोनकडे पाहताना दिसतो. यामुळे चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की, डगआउटमध्ये फोन वापरणे नियमबाह्य आहे का? आणि याचा परिणाम वैभववर होईल का?
नेमकं काय घडलं?
ही घटना 10 एप्रिल रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान घडली. 11व्या षटकाच्या सुमारास, वैभव बाद झाल्यानंतर डगआउटमध्ये बसला होता. त्याचवेळी मॅनेजर रोमी भिंडर मोबाईल वापरताना दिसले.
आरआर डगआउट उल्लंघन:
– नियमानुसार व्यवस्थापक फोन वापरू शकतात.
– परंतु, व्यवस्थापक डगआउटमध्ये त्याचा वापर करू शकत नाहीत.
– रोमी भिंदरने डगआउटमध्ये फोन वापरला होता.
– त्याने “PMOA प्रोटोकॉल 2026” चे उल्लंघन केले आहे.
– त्याला मॅच रेफरी आणि अँटी करप्शन युनिटकडून बोलावले जाऊ शकते
– वैभव… pic.twitter.com/ezMSY2bt6W— विपिन तिवारी (@VipinTiwari952) 11 एप्रिल 2026
काय सांगतो नियम?
आयपीएलच्या PMOA प्रोटोकॉलनुसार डगआउट, ड्रेसिंग रूमजवळील खेळाडूंचा भाग, थर्ड अंपायर एरिया आणि मॅच रेफरी रूम याठिकाणी मोबाईल किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास सक्त मनाई आहे. फक्त टीम अॅनालिस्टला ठराविक वेळेत अॅनालिस्ट टेबलवर उपकरण वापरण्याची परवानगी असते. मॅनेजरला फोन वापरण्याची परवानगी असली तरी ती फक्त ड्रेसिंग रूमपुरती मर्यादित आहे. डगआउटमध्ये फोन वापरणे हा नियमभंग मानला जातो.
— क्रिकेट आयकॉनिक (@ankanghosh335) 11 एप्रिल 2026
आता पुढे काय?
या प्रकरणात रोमी भिंडर यांनी PMOA प्रोटोकॉल 2026 चे उल्लंघन केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळची ACSU त्यांना चौकशीसाठी बोलावू शकते. नियमभंग सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात वैभव सूर्यवंशीची कोणतीही चूक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई होणार नाही.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.