काँग्रेसमध्ये राडा, महिलेची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न

जालना : राज्यात काँग्रेसच्यावतीने (Congress) संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने जिल्हा स्तरावर आणि लोकसभा मतदारसंघात आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला जातआहे. संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून काँग्रेसचे वरिष्ठ नेते, निरीक्षक जिल्ह्यातील नेतृत्वासोबत चर्चा करत पुढील निवडणुकांची रणनीती आखत आहेत. मात्र, जालना (Jalna) येथील याच अभियानात काँग्रेस पक्षातील नेता आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं. पक्षातून हकालपट्टी झाल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिला पदाधिकारी आणि काँग्रेस जिल्हाध्यक्षांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना संबंधित महिलेकडून अर्वाच्या भाषेत टीपण्णी करण्यात आली, त्यामुळे संतापलेल्या देशमुख यांनी चक्क पायातील बूट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांना रोखल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचे संघटन सृजन अभियानाचे निरीक्षक हेमंतसिंह पटेल आणि काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या समोरच हा गोंधळ झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या अभियानाची चर्चा रंगली आहे.

जालन्यात काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाच्या बैठकीमध्ये आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. येथील महिला पदाधिकारी नंदा पवार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. त्यावेळी, महिलेकडून जिल्हाध्यक्षांना अर्वाच्य भाषा वापरण्यात आल्याने राजाभाऊ देशमुख यांनी पायातील बूट काढण्याचा प्रयत्न केल्याने याठिकाणी अधिकच गोंधळ उडाला होता. जालना महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरुन भाजपला मदत केल्याचा ठपका ठेवत महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करत नंदा पवार यांनी व्यासपीठावर जाऊन जिल्हाध्यक्षाना जाब विचारला. त्यावेळी, दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यातूनच महिलेकडून आक्षेपार्ह शब्दात जिल्हाध्यक्षांना बोलल्यानंतर राजाभाऊ देशमुख यांनी पायातील बुट काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोघांनाही थांबवले. मात्र, महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. या गोंधळामुळे जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा

जोपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत शांत बसणार नाही, सर्वात मोठं आंदोलन उभं करुन, जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा

आणखी वाचा

Comments are closed.